Verna Fire News: वेर्णा औद्योगिक वसाहतीत आगीचे थैमान! शॉर्टसर्किटमुळे काडतुसांच्या कंपनीतील साहित्य खाक; जीवितहानी टळली

Verna Fire Incident: आगीची तीव्रता मोठी असल्याने इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पणजी, मडगाव, वास्को येथील अग्निशमन दलाचे बंब तेथे पोहोचले.
verna fire news
verna fire newsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वेर्णा औद्योगिक वसाहतीतील काडतूस बनविणाऱ्या ह्युजेस प्रेसिशन कंपनीच्या एका विभागाला आग लागण्याची घटना शनिवारी (ता.२१) पहाटे ४ वा.च्या दरम्यान घडली. या आगीमध्ये तेथील दारूगोळा, रिकामी खोकी, कार्डबोर्ड जळून खाक झाले.

ही आग लागण्याची घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. त्या कंपनीच्या नाकेरी-बेतुल येथील गोदामामध्ये स्फोट होण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यामुळे ते गोदाम व कंपनी चर्चेत आली होती. त्यावेळी तेथील रहिवाशांनी तेथील गोदामाला विरोध केला होता.

ह्युजेस प्रेशिसन कंपनीमध्ये काडतुसे बनविण्यात येतात. या कंपनीच्या एका विभागाला आग लागल्याची माहिती वेर्णा अग्निशमन दलाला शनिवारी (ता.२१) पहाटे ४ वाजता मिळाली. ही माहिती मिळताच वेर्णा अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह तेथे पोहोचले.

आगीची तीव्रता मोठी असल्याने इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पणजी, मडगाव, वास्को येथील अग्निशमन दलाचे बंब तेथे पोहोचले. तेथे रिकामी खोकी तसेच कार्डबोर्ड अधिक प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात धूर तयार झाला होता.

मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग इतर भागांमध्ये तसेच जेथे तयार काडतुसे होती तेथे पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली. वेर्णा, वास्को, पणजी, मडगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही.

१.कंपनीच्या विभागात काडतुसे तयार करण्यासाठी लागणारा दारूगोळा ठेवण्यात आला होता. तेथील वीजवाहिन्यांत शॉर्टसर्किट होऊन त्याची ठिगणी त्या दारूगोळ्यावर पडली. त्यामुळे तेथे आगीचा भडका उडाला. ही आग पाहताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तेथील अग्निरोधक उपकरणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली.

verna fire news
Goa Fire Brigade: 15 दिवस, 386 कॉल्स! ‘अग्निशमन’ने वाचविली 1.87 कोटींची मालमत्ता; पावसामुळे वाढल्या पडझडीच्या घटना

२.तेथे असलेल्या रिकामी खोकी व कार्डबोर्डमुळे आग विझविण्यास थोडी अडचण आली. या रिकाम्या खोक्यांमुळे व कार्डबोर्डमुळे विझलेली आग तेथे बराच वेळ धुमसत होती. त्यामुळे ती पुन्हा वाढू नयेत यासाठी वेर्णा अग्निशमन दलाचे जवान सायंकाळी उशिरापर्यंत वेर्णा अग्निशमन दलाचे प्रमुख दिलेश गावकर यांच्यासह तेथे लक्ष ठेवून होते.

verna fire news
Goa Container Fire: दारूने भरलेल्या कंटेनरला भीषण आग, धारगळ महामार्गावर थरार; अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे 'अनर्थ टळला'

३.या आगीत नेमके काय-काय जळाले हे पोलिस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. काहींच्या मते तेथील काही काडतुसे आगीत नष्ट झाली तर काहींच्या मते तेथील फक्त दारूगोळा व रिकामी खोकी आगीत जळाली. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com