Goa Corona Update :राज्यातील विमानतळांवर कोरोना चाचणीची सुविधा; राज्यात गेल्या 24 तासात 99 नवे कोरोना रूग्ण

गेल्या 24 तासात रूग्णालयातून 5 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

जी-20 शिखर परिषदेची पहिली महत्वपूर्ण बैठक 17 ते 19 एप्रिल दरम्यान राजधानी पणजीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातून दाखल होणाऱ्या अतिमहनीय व्यक्तींसाठी दाबोळी व मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोना चाचणीची सुविधा तैनात करण्यात आली आहे.

ज्यांना लक्षणे आहेत अशा व्यक्‍ती चाचणी करून घेऊ शकतात. अर्थात चाचण्या ऐच्छिक आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

Goa Corona Update
South Film Industry: साऊथ इंडस्ट्रीतही आहे घराणेशाही? सातच कुटुंबे चालवताहेत संपूर्ण सिनेसृष्टी

आरोग्य खात्याचे 'ओएसडी डॉ. केदार रायकर यांनी सांगितले की, दोन्ही विमानतळांवर स्वॅब तपासणीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सोबत आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्या आहेत. जथे बैठक होणार आहे, त्या हॉटेल ग्रँड हयात परिसरातही चाचण्यांची सुविधा असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात नवीन 99 रूग्ण आढळून आले. गेल्या 24 तासात राज्यात एकूण 756 नवीन चाचण्या झाल्या. यातील 96 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे तर 3 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात रूग्णालयातून 5 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com