व्हेंन्झी व्हिएगस: बाणावलीचा विकास खुंटल्याचा आरोप

'विकासकामांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास विधानसभेत गोव्याच्या जनतेचा आवाज उठवू'
Goa Development
Goa Development Dainik Gomantak

पणजी: कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पैसे खर्च न करता निवडणूक लढता येते आणि जिकंता येते हे गोव्याच्या जनतेमुळे सिद्ध झाले आहे. आम्हाला ज्यांनी मतदान केले त्यांचे आपण आभार मानतो. सर्वांसाठी आपले कार्य सुरू राहणार असून, बाणावलीत विकासकामांच्या बाबतीत दुजाभाव झाल्यास विधानसभेत गोव्याच्या जनतेचा आवाज बनून राहू, असे आश्वासन बाणावलीचे नवनिर्वाचित आमदार व्हेंन्झी व्हिएगस यांनी पत्रकार परिषदेत दिले.

बाणावलीतील माजी आमदाराला गेल्या 35 वर्षात एकही आरोग्य केंद्र उभारता आले नाही. लोकांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच चर्चिल आलेमाव यांचा पराभव झाल्याचे व्हिएगस यांनी सांगितले. विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात जुने गोवे येथील अवैद्य बांधकामाबद्दल आवाज उठवू, असे व्हेंन्झी व्हिएगस यांनी सांगितले.

Goa Development
केळबाय देवस्थान निवडणुकीला स्थगिती

आम आदमी पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी म्हणाल्या, गोव्याच्या जनतेने जे प्रेम दिले त्याबद्दल मी सर्व गोमंतकीयांचे आभार मानते. आपचे जे दोन उमेदवार निवडून आले आहेत ते खऱ्या अर्थाने आम आदमी असून त्यांना कसलीच राजकीय पार्श्‍वभूमी नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. हे दोघेही गोवा विधानसभेत आम आदमीचे प्रतिनिधित्व करतील. बाणवली आणि वेळ्ळी या दोन्ही मतदारसंघ विकासाचे मॉडेल ठरतील असेही त्या म्हणाल्या.

राहुल म्हांबरे म्हणाले, मी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांचे तसेच भाजपलाही यश लाभल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. आमचे दोन्ही आमदार विधानसभेत पोहचल्याने ही आमची सुरवात आहे. भविष्यात आम्हाला अधिक यश मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com