Goa News: रेल्वे दुपदरीकरणासाठी संबंधित अधिकारी काल जागेचा मालकी हक्क दाखवण्यासाठी कागदपत्रे घेऊन येणार होते. मात्र, त्यांच्याकडे काहीच पुरावे नव्हते. या अधिकाऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्टर आणि इतर अधिकारी हजर होते. मात्र, वेळसाववासीयांनी काल त्यांना धारेवर झाले. तसेच जमीनमालकांना पाठिंबा देत अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.
रेल्वे खात्याच्या कंत्राटदाराकडे कामाच्या ऑर्डरची प्रतही नाही. कंत्राटदाराने भाटकारांच्या जमिनीमध्ये सुमारे दीड मीटर अंतरापर्यंत अतिक्रमण केले आहे. मात्र, सरकारी यंत्रणा यासंबंधी कोणतीही कारवाई करत नाही, असा दावा ग्रामस्थांनी केला.
रेल्वे विकास निगम लिमिटेड दुपदरीकरणासाठी जागेचा मालकी हक्क दाखवू न शकल्याने गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा गाव सांभाळणारच. गावासाठी काय बरे, काय वाईट ते आम्हीच ठरवणार, असा निर्धार करत वेळसावमध्ये आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना हाकलून लावले. मात्र, पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
वेलसाव येथील रेल्वे दुपदरीकरणाचा विषय तापला असून रेल्वे खात्याने गावकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे सोडलेले नाही. तर दुसऱ्या बाजूने गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावातून रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे.
वेळसांव येथील भाटकार व पंचायतीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये रेल्वे खात्याने भाटकारांच्या जमिनीमध्ये सुमारे दीड मीटर अंतरापर्यंत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा दावा ‘गोयंचो एकवोट’चे ओलेंसियो सिमोईस आणि ओव्हिल दोरादो यांनी केला आहे.
याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. रेल्वे निगमने हे बांधकाम चार दिवसांत बंद करावे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा आठ दिवसांपूर्वी दिला होता.
अडथळे हटवले
वेळसाव येथे रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी खासगी जमिनीत अतिक्रमण केल्याचा जमीनमालकाचा दावा आहे. त्यासाठी जमीनमालकाने आपल्या जमिनीत काँक्रिटचे खांब रोवून दुपदरीकरणास मज्जाव केला. त्यामुळे रेल्वे निगमने वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज पोलिस बळाचा वापर करून ते खांब हटवण्यात आले.
दोन्ही बाजूंकडून जमिनीवर मालकीचा दावा होत असल्याने पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दोन्ही गटांना जमिनीचे दस्तावेज घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे जमीनमालक कागदपत्रे घेऊन हजर होते. परंतु रेल्वेचे अधिकारी या जमिनीवरील दावा सिद्ध करू शकले नाहीत.
पारंपरिक जलस्रोत नष्ट
दोरादो यांनी रेल्वे निगमच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. आम्ही सर्वेक्षण केल्यावर निगमच्या काही बेकायदा गोष्टी समोर आल्या. त्यांनी खासगी जागेत अतिक्रमण केले आहेच. शिवाय पावसाच्या पाण्याची पारंपरिक वाट नष्ट केली आहे.
त्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे निगमला निसर्गाच्या स्वाभाविक रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.