Sand Extraction: गुन्हेगारांना ना धाक ना भय; खांडेपार नदीत अवैध वाळू उपसा सुरुच

कारवाई झाली तरीही खांडेपार - शक्रे येथे रेती उपसा सुरुच
Khandepar River
Khandepar RiverDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गावठन खांडेपार येथे शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी बंदर कप्तान खात्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे. यात साहित्यही जप्त केले असून याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. असे असताना जवळच असलेल्या खांडेपार - शक्रे येथे नदीत पंप लावत अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्याचे काम सुरू ठेवले आहे. तरीही अशा प्रकारांवर कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी आज संताप व्यक्त केला आहे. (Khandepar locals demand action against illegal sand extraction at the Khandepar river )

Khandepar River
Goa Water Bill Hike: रहिवासी संकुलांचा सरकारवर जोरदार 'हल्लाबोल'

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार खांडेपार - शक्रे येथील नदी पात्रात रात्रीच्यावेळी सक्शन पंप लावून नदीतील रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यात येत आहे. अंधाऱ्या रात्रीत हा व्यवसाय तेजीने सुरु असतो. यात अनेक प्रतिष्ठीत नावे गुंतल्याचा संशय असून या कार्यात मोठे रॅकेट गुंतल्याची शक्यता आहे. यामार्गाने अनेकांनी पुष्कळ पैसे छापणे सुरु केले आहे. त्यामूळे याला आवर घालणार कोण? असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.

Khandepar River
Goa Agriculture: कृषी उत्पादन वाढीसाठी 'आत्मा'चे मिशन बार्देश!

नदीच्या दोन्ही बाजूच्या कडा कोसळल्या

गेल्या वर्षभरापासून परिसरात सक्शन पंप मशीनद्वारे रेती उपसा सुरू करण्यात येत असल्याने नदीच्या दोन्ही बाजूच्या कडा कोसळलेल्या आहेत. यामध्ये पर्यावरणहानी सुरु आहेच. सोबत नदी पात्र देखील मोठ्या प्रमाणात बदलत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेश पायदशी तुडवत बेकायदेशीर रेती उपसा सुरु असून उपसा करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com