Narcotic Supplier: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक

2 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त
Ponda police
Ponda policeDainik Gomantak

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थविरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. गेल्या काही दिवसात गोवा पोलिसांकडून ही मोहिम अधिक वेगाने राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी फोंडा पोलिसांनी छापा टाकत 28 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

(ponda police arrest narcotic supplier Bikash Chandra)

Ponda police
'निवेदन' क्लबतर्फे नवाब शेख आणि संगीत शिक्षक शरद मठकर यांचा सत्कार

मिळालेल्या माहितीनुसार फोंडा पोलिसांना बेथोरा, फोंडा परिसरात एक युवक अमली पदार्थासह येणार असल्याचा सुगावा लागला होता. यावरुन पोलिसांनी बेथोरा फोंडा येथे 1 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार संशयित या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संशयिताकडे 2 किलो वजनाचा गांजा असल्याचे आढळून आले आहे. याची किंमत सुमारे 2,00,000 रुपये इतकी आहे.

Ponda police
Goa Government Schools : सरकारी शाळांच्या स्थितीस सरकारच जबाबदार; बर्डेंचा निशाणा

संशयिताला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई 2 सप्टेंबर रोजी सकाळी 2 वाजेपर्यंत सुरु होती. बेथोरा जंक्शन, बेथोरा फोंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून यावेळी विकास चंद्र वय 28 या संशयितास अटक केली आहे. संशयित मुळचा ओडिशा येथील असुन फोंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पीएसआय नितेश काणकोणकर, पीएसआय परेश सिनारी एएसआय जितेंद्र गौडे, केदार जलमी, सूरज गौडे यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com