Vedanta Sesa Goa : ‘सेझा’च्‍या 205 कामगारांचे भवितव्‍य उद्याच्‍या बैठकीवर

मुख्‍यमंत्री करणार व्‍यवस्‍थापनाशी चर्चा
Vedanta Sesa Goa| Cm Pramod Sawant
Vedanta Sesa Goa| Cm Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta Sesa Goa : डिचोलीतील सेझा खाण कंपनीतील 205 कामगारांना वेदान्‍ता कंपनीने घरी पाठविण्याच्या घेतलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर आमदार, नगरपालिका मंडळ, जिल्‍हा पंचायत सदस्य, कामगार संघटना व सल्लागार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत चर्चा होऊन येत्या सोमवार दि. १० जुलै रोजी सेझा-वेदान्‍ताचे सीईओ यांच्याशी मुख्यमंत्री व आमदारांची महत्त्‍वाची बैठक होणार आहे. त्यामुळे आता बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

साखळी रवींद्र भवनात झालेल्या या बैठकीला मुख्‍यमंत्र्यांसह डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, सहकारी नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, कामगार संघटनेचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर, अध्यक्ष नीलेश कारबोटकर, सरचिटणीस किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर व इतरांची उपस्थिती होती.

बैठकीतील चर्चेत युवा असलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे तर ज्‍येष्‍ठ कामगारांसाठी कंपनीकडून देण्‍यात आलेल्‍या सेटलमेंटमध्ये बदल करावा. त्यांना १५ दिवसांऐवजी ६० दिवसांचे सेटलमेंट देऊन त्याप्रमाणे पैसे द्यावेत. त्यामुळे या कामगारांचे भवितव्य सुरक्षित होईल अशा मागण्‍या मुख्‍यमंत्र्यांसमोर ठेवण्‍यात आल्‍या, असे आमदार शेट्ये यांनी सांगितले.

Vedanta Sesa Goa| Cm Pramod Sawant
Goa Crime News : खैराच्या झाडांच्या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गातील संशयिताला अटक; सात संशयित फरार

‘सेझा’ या कामगारांनी कंपनीच्या अटी मान्य करून कामावर रूजू व्हायला हवे होते. तरीसुद्धा याबाबत आपण येत्‍या सोमवारी सेझा-वेदान्‍ताचे सीईओ नवीन जाजू यांच्याशी आमदारांसमवेत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेन. कोणावरही अन्‍याय होऊ देणार नाही.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

मुख्यमंत्र्यांसह डिचोली तालुक्यातील तिन्‍ही आमदार ‘सेझा’च्‍या या कामगारांसमवेत आहेत. त्यांना कामाची सुरक्षा मिळावी व समाधानकारक लाभ मिळावा यासाठी हा विषय गांभीर्याने घेण्यात आलेला आहे. त्‍या अनुषंगाने सोमवारी होणारी बैठक महत्त्‍वाची ठरणार आहे.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, डिचोलीचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Meeting Central Officials
Goa CM Pramod Sawant accident help
Pramod Sawant ST Reservation
Pramod Sawant ST Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com