Bicholim Mining: .. अखेर वाद मिटला! डिचोलीत आमदारांची शिष्टाई; खनिज वाहतूक पूर्ववत सुरू होणार

Vedanta mining transport: खनिज वाहतूक प्रश्नावरून डिचोलीतील वेदांता कंपनीच्या खाणीवर निर्माण झालेला गुंता अखेर तात्पुरता सुटला आहे.
Mineral transportation restart Goa
Vedanta mine transportationDainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta mine transportation news

डिचोली: खनिज वाहतूक प्रश्नावरून डिचोलीतील वेदांता कंपनीच्या खाणीवर निर्माण झालेला गुंता अखेर तात्पुरता सुटला आहे. गेल्या आठवडाभरापासून बंद असलेली खनिज वाहतूक येत्या सोमवारपासून (ता. ३) पूर्ववत सुरू होणार आहे.

आज (ता.१) सायंकाळी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खाणीवरील बाराचाकी हायटेक कंत्राटी ट्रक बंद करण्याची डिचोली ट्रकमालक संघटनेची मागणी ‘वेदांता’च्या व्यवस्थापनाने मान्य केली. सोमवारपासून खनिज वाहतूक सुरू होणार असली, तरी हायटेक ट्रकचे काम स्थानिक ट्रकना करावे लागणार आहे.

स्थानिक ट्रकच्या कामाचा आढावा घेऊनच दहा दिवसांनंतर याप्रश्नी अंतिम निर्णय होणार आहे. ‘वेदांता’ने कंत्राटी हायटेक ट्रक आणून खाणीवर कामाला लावल्याने स्थानिक ट्रकमालकांमध्ये खळबळ उडाली होती. हायटेक ट्रक खाणीवर नकोत, अशी मागणी करीत ट्रकमालकांनी खनिज वाहतूक बंद केली होती. त्यामुळे सोमवारपासून डिचोली खाणीवरील खनिज वाहतूक ठप्प होती.

खनिज वाहतुकीवरून निर्माण झालेला गुंता सोडविण्यासाठी गेला आठवडाभर प्रयत्न सुरू होते. मंगळवारीही एक बैठक झाली होती. मात्र, गुंता ‘जैसे थे’ होता. या प्रश्नावर आज सायंकाळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीत एक महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीस ''वेदांता''चे मुख्य कार्यकारी उपअधिकारी धीरजकुमार जगदीश यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम परब गावकर, सचिव सुभाष किनळकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सुमारे दीड तास ही बैठक चालली. हायटेक ट्रक आणण्यामागील कारण वेदांताच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, ट्रकमालकांनी हायटेक ट्रक खाणीवर नकोच, अशी भूमिका घेतली. स्थानिक ट्रकवाल्यांच्या हिताचा विचार करून दोन्ही आमदारांनी ट्रकमालकांची मागणी उचलून धरली. अखेर ‘वेदांता’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हायटेक ट्रक बंद ठेवण्याची मागणी मान्य केली.

Mineral transportation restart Goa
Bicholim Mining: पिळगाववासीय ठाम, ट्रकमालक विवंचनेत! 'खाण'वाहतूक प्रश्नावर सरकार कोणता निर्णय घेणार?

स्थानिकांच्या हिताला प्राधान्य

स्थानिक ट्रकमालकांवरील ताण हलका करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हायटेक ट्रक सुरू केले होते. मात्र, स्थानिक ट्रकमालकांचे हित लक्षात घेऊन हे ट्रक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ''वेदांता''च्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले. कंपनी खाण अवलंबित घटकांचे सदैव हित जपत आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Mineral transportation restart Goa
Bicholim Mining: खनिज वाहतुकीसाठी बाहेरील ट्रक नकोच! आमदारांच्या बैठकीत तापले वातावरण, स्थानिकांनी मांडले गाऱ्हाणे

आमदारांकडून समाधान

खनिज वाहतुकीचा गुंता सुटल्याने डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी समाधान व्यक्त केले. पुढील निर्णय होईपर्यंत कंपनीने केलेली सूचना पाळून आणि मतभेद बाजूला ठेवून ट्रकवाल्यांनी खनिज वाहतूक करावी, असे आवाहन दोन्ही आमदारांनी ट्रकमालकांना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com