Bicholim Mining: पिळगाववासीय ठाम, ट्रकमालक विवंचनेत! 'खाण'वाहतूक प्रश्नावर सरकार कोणता निर्णय घेणार?

Vedanta Mineral Truck Transport Dispute: खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ पडल्यामुळे ट्रक मालक आणि कामगारांसह खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांची अस्वस्थता वाढली आहे.
Goa Mining Issue
Vedanta Mining Ore Transport BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta Mining Mineral Truck Transport Dispute

डिचोली: डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीवरील खनिज प्रश्नी निर्माण झालेला ‘गुंता’ अजूनही ‘जैसे थे’ आहे. या प्रश्नावर सरकार आता काय आणि कोणता निर्णय घेते. त्याकडे ट्रक मालकांसह खाण कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे. खनिज प्रश्नी उद्यापर्यंत तोडगा अपेक्षित आहे.

खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ पडल्यामुळे ट्रक मालक आणि कामगारांसह खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांची अस्वस्थता वाढली आहे. रात्रपाळीत ट्रकांची धडधड नकोच, अशी भूमिका घेत पिळगावच्या लोकांनी गुरुवारी मध्यरात्री खनिज वाहतूक रोखून धरली. त्यानंतर खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ लागला आहे. या प्रश्नी शुक्रवारी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही कोणताच निर्णय होऊ शकला नाही. रात्रपाळीत खनिज वाहतूक नकोच. या निर्णयाशी पिळगावच्या बागवाडा, माठवाडा परिसरातील लोक ठाम आहे.

Goa Mining Issue
Goa Mining: नोकऱ्या द्या, मग खाणी सुरू करा! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांची मागणी

खनिज वाहतुकीत खंड पडताच भवितव्याच्या काळजीने गलितगात्र बनलेल्या कामगारांसह ट्रक मालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडताना खनिज प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. रात्रपाळीत खनिज वाहतूक नको असल्यास दिवसा वेळ आणि ट्रिप वाढवून द्याव्यात. असा प्रस्ताव डिचोली ट्रक मालक संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिला आहे, अशी माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कामगारांसह सकारात्मक आश्वासन दिल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com