Goa Mining: खनिज वाहतूकीचा प्रश्न सुटणार? कोंडी टाळण्यासाठी सरकारने घातल्या 'या' अटी; आजपासून ट्रक धावण्याची शक्यता

Goa Mining Transport: खाणीवरील रस्ता अडवल्याने पिळगाव जंक्शन ते सारमानस या सार्वजनिक रस्त्याने खनिज वाहतुकीस परवानगी द्यावी. असा प्रस्ताव ‘वेदांता’ कंपनीने सरकारला दिला आहे. या प्रस्तावाला सरकारने मान्यता देताना ८०० मीटर सार्वजनिक रस्ता वापरण्याची मुभा दिल्याची माहिती मिळाली आहे.
Mining Transport
Mining trucksDainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta proposal for public road usage in pilgao

डिचोली: डिचोलीतील खनिज वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्ता वापरण्यास सरकारने मान्यता दिली असून, वेदांताच्या खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. सरकारने परवानगी दिलेल्या सार्वजनिक रस्त्याने खनिज वाहतूक करण्याची ‘वेदांता’ने तयारीही सुरू केली असून, उद्यापासून खनिज वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चौदा तासांत ६२० ट्रिप

खाणीवरील रस्ता अडवल्याने पिळगाव जंक्शन ते सारमानस या सार्वजनिक रस्त्याने खनिज वाहतुकीस परवानगी द्यावी. असा प्रस्ताव ‘वेदांता’ कंपनीने सरकारला दिला आहे. या प्रस्तावाला सरकारने मान्यता देताना ८०० मीटर सार्वजनिक रस्ता वापरण्याची मुभा दिल्याची माहिती मिळाली आहे. सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रस्तावित रस्त्याने रात्रीच्यावेळीही खनिज वाहतूक करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती आहे.

Mining Transport
Goa Cabinet reshuffle : गोव्यात राजकीय चर्चांना उधाण! मंत्रिमंडळात मोठा फेरबदल पण नेतृत्वावर मात्र विश्वास; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

त्यानुसार विश्रांतीची वेळ सोडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतुकीचा पर्याय खाण खात्याने ‘वेदांता’समोर ठेवला आहे. दिवसा दर ताशी ४० आणि रात्री दर ताशी ५० ट्रिप खनिज वाहतूक करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती मिळाली आहे. नव्या प्रस्तावानुसार सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजेपर्यंत मिळून १४ तासांत तब्बल ६२० ट्रिप खनिज वाहतूक होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com