Goa : वास्कोच्या विकासाला यापुढे राज्य सरकार प्राथमिकता देणार; सदानंद शेटतानावडे

राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष याने सर्व मतदार संघातील गट समित्या, महिला मोर्चा समित्या व इतर पदाधिकाऱ्यां बरोबर बैठका घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे वास्को मुंडवेल येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण  मंदिरतर्फे गौरव स्वीकारताना सोबत आमदार कार्लुस आल्मेदा व इतर.
राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे वास्को मुंडवेल येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण मंदिरतर्फे गौरव स्वीकारताना सोबत आमदार कार्लुस आल्मेदा व इतर.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: आमदार कार्लुस आल्मेदा वास्को (Vasco) मतदारसंघातून (From the constituency) तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक साधणार आहेत. तसेच वास्कोच्या विकासाला (Vasco's development) यापुढे राज्य सरकार प्राथमिकता देऊन येथील कामे पूर्णत्वाकडे घेऊन जाणार असल्याची माहिती गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (Goa BJP state president) सदानंद शेटतानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी दिली.

राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे वास्को मुंडवेल येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण  मंदिरतर्फे गौरव स्वीकारताना सोबत आमदार कार्लुस आल्मेदा व इतर.
युतीबद्दलची भूमिका चतुर्थीपूर्वी स्पष्ट करा, विजयचेही काँग्रेसला अल्टीमेटम

राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष याने सर्व मतदार संघातील गट समित्या, महिला मोर्चा समित्या व इतर पदाधिकाऱ्यां बरोबर बैठका घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे याने वास्को येथील आपल्या ११ व्या दौऱ्यात वास्को भाजप गटाच्या विविध समित्यां बरोबर बैठका घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, सचिव यातिन कामुर्लेकर, संदीप नार्वेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमय चोपडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अध्यक्ष तानावडे म्हणाले की आमदार आल्मेदा वास्कोत पुन्हा एकदा 2022 च्या विधानसभा निवडणूक जिंकून हॅटट्रिक साधणार आहे. आल्मेदा यांना वास्कोतील जनतेबरोबर ठेवलेल्या संपर्कामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची माहिती तानावडे यांनी दिली. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे याने आपल्या वास्को मतदार संघात आले असता त्याने विविध धार्मिक स्थळाची भेट घेतली.

राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे वास्को मुंडवेल येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण  मंदिरतर्फे गौरव स्वीकारताना सोबत आमदार कार्लुस आल्मेदा व इतर.
Goa: माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी कार्यकर्त्यांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

यावेळी तानावडे, येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यशवंत परब यांनी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी मंदिरात आमदार आल्मेदा, नगरसेवक फॅन्ड्रीक हेन्रीक्स, यतिन कामुर्लेकर, मंदिराचे उपाध्यक्ष उमेश भगत, अश्विन देसाई, चेतन मरुडकर, स्वप्नील नाईक, नरेश नाईक, परेश नाईक, अविष परब, प्रशांती शेट्टी, छाया परब, बाबू शेट्टी, शेखर बागकर, रमेश नाईक, सिद्धेश नाईक, दामोदर तांडेल, प्रशांत तांडेल, अरुण मांद्रेकर व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी मंदिराचे मुख्य पुरोहित सुब्रमण्यम भट यांनी सामूहिक गाराने घातले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Women Commission Vacancy
Colvale Jail Inmate Attack News
Supreme Court Casino GST Verdict
cricket betting racket in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com