Water Shortage: ...यामुळे म्हापशाच्या तीन प्रभागात पाणीटंचाई

म्हापसा येथील शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावेळी साबांखाची जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
Water Shortage
Water Shortage Dainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage: म्हापसा येथील शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावेळी साबांखाची जलवाहिनी फोडल्याने 10, 12 व 19 या प्रभागांतील काही नागरिकांना मागील आठवड्याभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची कैफियत मांडत स्थानिकांनी आज शनिवारी या प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

म्हापशात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून या कामावेळी बेशिस्तपणे खोदकाम केले जाते. परिणामी जलवाहिनी बाधित केली जाते. त्यामुळे नळांना पाणी येत नाही, अशी तक्रार करीत दत्तवाडी परिसरातील लोकांनी या भूमिगत वीजवाहिन्यांचे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

पाण्याच्या समस्येविषयी साबांखा तसेच वीज विभागाकडे विचारपूस करण्यास गेल्यास तेथील अधिकारी असमाधानकारक उत्तरे देत आपली जबाबदारी झटकताहेत. मग सर्वसामान्यांनी कुणाकडे जावे?

Water Shortage
Goa Tourism : आपण पर्यटकांना गोवा कसा दाखवतोय? याचा परिणाम इथल्या संस्कृतीवर तर होत नाही? वाचा सविस्तर

उद्या सकाळी नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्यास जबाबदार कोण? असे सवाल रमेश नाईक यांनी उपस्‍थित करून त्यांनी प्रशासनाच्या एकंदरीत भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक-दोन दिवस जनता कळ सोसू शकते.

मात्र आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटूनही ही समस्या ‘जैसे थे’ आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याकडे डोळेझाक करताहेत. मग अशा लोकप्रतिनिधींची गरजच काय, असा संतप्‍त सवालही नाईक यांनी केला.

दरम्‍यान, ब्रिजेश म्हापसेकर, संजय विर्नोडकर, संदीप म्हापसेकर व महाबळेश्वर पार्सेकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

Water Shortage
Goa News: कुंपनानेच शेत खाल्लं; त्याने आपल्याच कंपनीत केली लाखाेंची चोरी

लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करू

भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर ए. के. चंद्रन म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी आम्ही या भागात काम सुरू केले आहे. मात्र स्थानिक मागील दहा दिवसांपासून पाणी येत नाही असे सांगताहेत. सध्या खोदकाम करून कुठे गळती आहे का, हे तपासले जाणार आहे.

जर सर्व काही व्‍यवस्‍थित असेल तर ती वाहिनी दुरुस्त करुन लोकांचा पाणीपुरवठा सुरळीत करू.अन्यथा दुसरी वाहिनी बायपास करून पुरवठा उपलब्ध करून देणार आहे.

भूमिगत वाहिन्‍यांचे काम सुरू आहे. आमचा विकासकामांना विरोध नाही, परंतु कामाच्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती किंवा अधिकारी उपस्‍थित राहणे गरजेचे आहे. कारण कामगारांकडे ही मंडळी फक्त यंत्रसामग्री सोपवितात आणि नंतर कामगार हवे तसे खोदकाम करतात. त्‍यामुळे अनेकदा जलवाहिनी फोडली जाते. परिणामी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. - मंगेश बिचोलकर, ग्रामस्‍थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com