वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताह कोविड नियमांबरोबर आरोग्य नियमांचे पालन करून सप्ताह वास्कोमध्ये उत्साहात साजरा केला जाणार आहे. श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समिती या वर्षीचा वार्षिक भजनी सप्ताह सोहळा 3 आणि 4 ऑगस्ट रोजी वास्को येथे साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती केंद्रीय समितीचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत प्रशांत जोशी यांनी दिली.
यंदा साजरा होणारा सप्ताह वास्कोत सार्वजनिकरीत्या साजरा करण्यात येणार असून 3 ऑगस्ट श्री दामोदर भजनी सप्ताहदिनी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकासाठी ‘श्री’चे दर्शन घेता येणार नाही. कारण अजूनही कोविड रुग्ण आढळत असल्याने केंद्रीय व उत्सव समितीने असा निर्णय घेतला आहे. दुपारी 2 नंतर सर्व भाविकासाठी दर्शन सुरू होणार असल्याने शक्य ते भक्तांनी कोविड नियमाचे पालन करून ‘श्री’चे दर्शन घ्यावे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
यंदाच्या सप्ताहात काही ‘पार’ समित्यांना पौराणिक चित्ररथ (पार) करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने, काही पार समित्या ‘थळी’ घेऊन दिंडी करून मंदिरात येणार आहेत. मंदिरात पोलिस यंत्रणेबरोबर खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे. यात भक्तानी उत्सव समितीला सहकार्य करावे. 4 रोजी होणारी भजनी सप्ताहाची समाप्ती मंदिरात होत होती, परंतु यंदा बाहेरील मंदिराच्या मंडपात गोपाळ कालामार्फत होणार आहे. 3 रोजी सप्ताहदिनी दुपारी 12 वाजता अखंड भजनाला अशोक मनोहर मांद्रेकर यांच्या गायनाने सुरूवात होणार आहे.
गायन मैफलीचे आयोजन
मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता श्री दामोदर मंदिरा समोर उभारलेल्या मंडपात जयतीर्थ मेवूंडी (धारवाड) यांचे गायन होईल. त्यांना संगीतसाथ ऑर्गन दत्तराज सुर्लकर, हार्मोनियम दत्तराज म्हाळशी, तबला अजिक्य जोशी (पुणे), पखवाज प्रथमेश तारळकर (पुणे),मंजिरी योगेश रायकर करतील. बुधवार 3 ऑगस्ट रात्री 9 ते 10-30 वाजेपर्यंत हृषिकेश बडवे यांचे गायन होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.