मानवी हक्काच्या उल्लंघनातून एकोस्कर यांना ‘क्लीन चीट’

मानवी हक्काचे उल्लंघन झाले नसल्याचे आयोगाचे निरीक्षण
Sagar Ekoskar
Sagar Ekoskar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : शेळ - मेळावली येथील आयआयटी प्रकल्पविरोधात झालेल्या आंदोलनावेळी तत्कालिन पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केले नसल्याचे चौकशी अहवालात निरीक्षण करत त्यांना मानवी हक्क आयोगाने ‘क्लीन चीट’ दिली आहे. तक्रारदार वारंवार राजन घाटे सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्याने व निरीक्षक एकोस्कर यांच्याविरुद्धचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाले नसल्याचे निरीक्षण चौकशीत करण्यात आले आहे.

शेळ - मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या सर्वेसाठी स्थानिक मेळावली लोकांनी आंदोलन उभे केले होते. आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर या आंदोलनावर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी या आंदोलकांना हुसकून लावण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या असता त्याला प्रत्युत्तर देण्यास दगडफेक झाली. यावेळी काही महिलांनी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वाटेवरच झोकून दिले. त्यावेळी तेथे असलेल्या निरीक्षक एकोस्कर यांनी एका महिलेच्या छातीवर पाय ठेवून पलिकडे गेल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात राजन घाटे यांनी 12 जानेवारी 2021 रोजी मानवी हक्क आयोगाकड तक्रार दाखल केली होती. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, वाळपईचे निरीक्षक सागर एकोस्कर व वाळपई - सत्तरी उपजिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Sagar Ekoskar
फोंड्यात मासे, चिकन खरेदीसाठी गर्दी!

आयोगाने प्रतिवाद्यांना 13 जानेवारी 2022 रोजी नोटीस बजावून त्यांना उत्तर देण्यास सांगितले होते. निरीक्षक एकोस्कर यांनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर सादर केले होते. त्यानुसार आयोगाने तक्रारदार व प्रतिवाद्यांना सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगतिले होते. तक्रारदार 9 जुलै 2021, 11 एप्रिल 2022 व 15 जून 2022 रोजी सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत.

एकोस्कर यांनी सादर केलेल्या उत्तरात आंदोलनावेळी घडलेल्या प्रकरणाची दिलेल्या माहितीवरून मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत नाही. मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा पोलिसांचा उद्देश दिसून येत नाही. तक्रारदार आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे आयोगासमोर सुरू असलेली तक्रारीवरील सुनावणी बंद करण्यात येत असल्याचे निरीक्षण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com