वास्को येथील 'नागरी पुरवठा कार्यालयाचे' नवीन वास्तूत स्थलांतर..

नागरी पुरवठा खात्याच्या वास्कोतील कार्यालयाचे, सांता पेलाजीया इमारतीत स्थलांतर;विधीवत पूजा अर्चा केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाला आज पासून सुरुवात..
 vasco येथील नागरी पुरवठा कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आल्यानंतर येथे सुरू असलेले कामकाज हाताळताना कार्यालयीन कर्मचारी.

vasco येथील नागरी पुरवठा कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आल्यानंतर येथे सुरू असलेले कामकाज हाताळताना कार्यालयीन कर्मचारी.

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को : मुरगाव (Mormugao) पालिका इमारतीतील (Mormugao Municipal council building) नागरी पुरवठा खात्याच्या वास्कोतील (Vasco) कार्यालयाचे येथील सांता पेलाजीया इमारतीत स्थलांतर करण्यात आले असुन विधीवत पूजा अर्चा केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p> vasco येथील नागरी पुरवठा कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आल्यानंतर येथे सुरू असलेले कामकाज हाताळताना कार्यालयीन कर्मचारी.</p></div>
'रिव्होल्युशनरी गोवन्सची' दक्षिण गोव्यात जाहीर सभा...!

येथील पालिका इमारतीच्या नूतनीकरणाचे (Renewal) काम सुरू असून या इमारतीत असलेल्या विविध सरकारी कार्यालयांचे स्थलांतर इतरत्र करण्यात आली आहे. यात उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच मामलेदार कार्यालयाचे स्थलांतर बायणा येथील रवींद्र भवनात करण्यात आले आहे. भारत संचार निगम कार्यालय त्यांच्या पोलीस स्थानकासमोरील इमारतीत स्थलांतर झाले आहे. तसेच आरोग्य खात्याचे फिलेरिया युनिट बायणा येथील रवींद्र भवन शेजारी आरोग्य केंद्रात स्थलांतर केले होते. मात्र वादळी पावसाळ्यात सदर केंद्रावर झाड कोसळल्याने ते तात्पुरते रवींद्र भवनात स्थलांतरित केले होते, मात्र आरोग्य केंद्राची डागडुजी केली असली तरी आरोग्य खात्याचे फिलेरिया युनिट अजून आपले बस्तान रवींद्र भवन मध्ये तळमजल्यावरच ठोकून आहे. तेथून हलण्याचे ते नाव घेत नाही. पालिका इमारतीतील अबकारी खात्याचे कार्यालय यापूर्वीच सर्वप्रथम त्यांनी स्थलांतर केले होते.

<div class="paragraphs"><p> vasco येथील नागरी पुरवठा कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आल्यानंतर येथे सुरू असलेले कामकाज हाताळताना कार्यालयीन कर्मचारी.</p></div>
मडगाव 'कोमुनिदाद निवडणुकीत' एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप..!

आता पालिका कार्यालय तसेच जनता वाचनालयाचे स्थलांतर होणे बाकी आहे. जोपर्यंत ही दोन्ही कार्यालय स्थलांतर होत नाही तोपर्यंत इमारतीचे पुढील काम होणार नाही यासाठी कंत्राटदार या कार्यालयाचे स्थलांतराची वाट पाहत आहे. म्यूनिसिपल हायस्कूल, जनता वाचनालयात आपले वर्ग घेत असून त्याने ही स्थलांतर होणे क्रमप्राप्त आहे.

दरम्यान या इमारतीतील नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाचे स्थलांतर येथील हॉटेल अन्नपूर्णा शेजारी सांता पेलाजीया इमारतीत दुसऱ्या मजल्यावर करण्यात आले असून, आज या कार्यालयात नागरी पुरवठा खात्याचे वास्को कार्यालय निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. पुरोहीता मार्फत पूजा-अर्चा झाल्यानंतर आपले कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात करण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी या नवीन जागी कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन वास्को कार्यालय निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com