'रिव्होल्युशनरी गोवन्सची' दक्षिण गोव्यात जाहीर सभा...!

रिव्होल्युशनरी गोवन्स आयोजित दक्षिण गोव्याचा महामेळावा
Revolutionary Goans

Revolutionary Goans

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव (Margao) : आर्लेम-मडगाव येथील क्रिकेट मैदानावर मंगळवारी (ता. 14) डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता रिव्होल्युशनरी गोवन्सने (Revolutionary Goans) पूर्ण दक्षिण गोव्याची (Goa) जाहीर सभा आयोजित केली आहे. सर्व दक्षिण गोव्यातील मतदारसंघातून भरभरून जनतेने या सभेला उपस्थित रहावे, अशी विनंती आरजीचे अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी समाज माध्यमातून केली आहे.

<div class="paragraphs"><p>Revolutionary Goans</p></div>
मडगाव 'कोमुनिदाद निवडणुकीत' एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप..!

बाणावलीमध्ये झालेल्या पोगो रॅलीनंतर शहरात होणारी दक्षिण गोव्यात ही दुसरी सभा असल्याचे परब यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात कित्येक आरजीचे समर्थक आहेत यांना प्रत्येक वेळी उत्तर गोव्यात सभांना रस्ते बरोबर नसल्याने हजर राहणे कठीण जाते. त्यामुळे दक्षिण गोव्यात ही सभा आयोजित केली आहे. या सभेला सांस्कृतिक कार्यक्रम, आरजीची छोटी छोटी दालने व परब यांचे भाषण या सर्व गोष्टींचा समावेश असेल. आरजीची गोव्यासाठी पुढील भविष्यातील धोरणे या सभेला जाहीर केली जातील. एक वेगळा अनुभव या सभेतून जनतेला मिळेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com