वास्कोच्या रवींद्र भवनमध्ये असलेल्या सरकारी कार्यालयांना जागा खाली करण्याचे निर्देश; 'हे' आहे कारण

वास्कोमधील रवींद्र भवन येत्या 1 जूनपासून ते पुन्हा सुरू होणार
Vasco Ravindra Bhavan
Vasco Ravindra BhavanDainik Gomantak

वास्कोमधील रवींद्र भवन काही कारणास्तव 2 वर्षांपासून बंद होते. मात्र येत्या 1 जूनपासून ते पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा असल्याने, त्याच्या परिसरात कार्यरत असलेल्या तीन सरकारी कार्यालयांना मे अखेरपर्यंत जागा खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Vasco Ravindra Bhavan
New Traffic Rule : गोयकारांनो जाणून घ्या नवा वाहतूक नियम

रवींद्र भवन च्या परिसरात मुरगाव उपजिल्हाधिकारी सह उपविभागीय दंडाधिकारी, मामलतदार आणि वास्को शहरी आरोग्य केंद्र यांचा समावेश आहे, जे लसीकरण कार्यक्रम आयोजित करतात.

गोवा राज्य नागरी विकास एजन्सी (GSUDA) अंतर्गत मुरगाव नगरपरिषद (MMC) इमारत नूतनीकरणाच्या कामात असल्याने ही तिन्ही कार्यालये तात्पुरते रवींद्र भवन येथे हलविण्यात आली होती.

याबाबत रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव म्हणाले की, वातानुकूलित युनिटमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे रवींद्र भवनचे मुख्य सभागृह जवळपास दोन वर्षांपासून बंद होते. त्यानंतर आम्ही आमची आर्ट गॅलरी आणि तिकीट बुकिंग काउंटर तात्पुरते मुरगाव मामलतदार कार्यालयाला दिले आहेत, तर पहिल्या मजल्यावरील कॅन्टीन मुरगाव उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोकळ्या जागेचा वास्को शहरी आरोग्य केंद्र वापरत आहे.

या तीन सरकारी कार्यालयातील कर्मचारी आमच्या शौचालयांचा मोफत वापर करत होते. रवींद्र भवन व्यवस्थापनाने या कार्यालयांच्या प्रमुखांना आमच्या जागेचा वापर करण्यासाठी नाममात्र भाडे देण्यास सांगितले असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com