Vasco Police: फरार आरोपीला थरारक पाठलाग करत पकडले

पाठलाग करताना दोन पोलीस कर्मचारी जखमी
Railway Police
Railway PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील तसेच इतर वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असलेला एका फरारी आरोपीला रविवारी संध्याकाळी थरारक पाठलाग करून पकडला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

(Vasco Railway Police nabbed the absconding accused)

Railway Police
Valpoi: ''नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज''

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा हरिजन आणि प्रेम जाधव या दोन पोलीस कर्मचार्‍यांनी वास्को रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बंगाली नामक एका आरोपीला अटक केली आहे. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपीचा ठावठिकाणा माहीत असल्याने त्यांनी त्याला नवेवाडे येथून उचलले.

Railway Police
Vasco: नागरिकांतर्फे "अखंड भारत दिना" निमित्त मशाल मिरवणूक

आरोपीला वास्को रेल्वे पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना, त्याने वाहनातून उडी मारून त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला, परंतु नंतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी जोरदार पाठलाग करून त्याला पकडले.

दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आरोपीकडे चाकू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालचा असून नवे वाडे येथील पाण्याच्या टाकीजवळ राहत होता. तो मूरगाव, वास्को, वेर्णा पोलीसांना अनेक आरोपाखाली पोलिसांना हवा होता. या गुन्हेगारावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का ? याचा रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com