वास्को: मुरगाव नगरपालिकेच्या वास्को येथील मुख्य भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. यावेळी भाजी विक्रेत्यांना दुकाना समोर बाजार मांडून ग्राहकाना ये-जा करताना कोणताही त्रास होता कामा नये, यासाठी सर्वती खबरदारी घेण्यात आली.
(Vasco police solved the encroachment problem of market vendors)
या भाजी मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचे काम मुरगाव नगरपालिकेचे आहे, मात्र हे काम सध्या वास्को पोलिसांनी केल्याने नागरीकांनी पोलीस निरीक्षक नायक व त्याच्या इतर पोलिसांचे विशेष आभार मानले.वास्को येथील मुरगाव नगरपालिकेच्या मुख्य भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्या कडून अतिक्रमण होत असल्याची तक्रार वास्को पोलिसांना येऊ लागल्यामुळे, अखेर पोलिसांनी या समस्येत लक्ष घालत सोमवारी म्हणजेच आज सकाळी अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावला.
वास्को पोलिस स्थानकांचे निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मयुर सावंत व इतर पोलिसानी वास्को भाजी मार्केटमध्ये जात ग्राहकांना त्रास होत असलेल्या अतिक्रमण केलेल्याना सुचना देण्यात आली. यापुढे रस्त्यावर ग्राहकांना येता जाताना त्रास झाल्यास कडक कारवाई केली जाईल असा सर्व भाजी विक्रेत्यांना इशारा देण्यात आला.
वास्को पोलिस निरीक्षक नायक यांनी जनतेच्या मागणीला प्राधान्य देऊन, एफएल गोम्स मार्गाच्या बाजूस असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या भाजी मार्केट अतिक्रमण हटविण्यास पुढाकार घेतला. वास्को भाजी मार्केट मधील अतिक्रमणावर नियंगत्रण आणल्याबद्दल ग्राहकांनी पोलिसांचे आभार मानले. खरेतर हे काम मुरगाव नगरपालिकेचे असून ही अतिक्रमणाविरोधात पोलिसांची मदत घ्यावी लागली अशी माहिती येथील नागरीकांतर्फे देण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.