'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

जावेद शेख आणि जबी मुल्ला हे दोन गोवा नॅशनल एस रायडर घेणार सहभाग
'Friendship Moto Cup
'Friendship Moto CupDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच रशियाच्या मोटरसायकल फेडरेशनने चार भारतीय एस रायडर्सना आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत चार भारतीय स्पर्धेक सहभागी होणार असून यापैकी गोव्यातील दोघे सहभागी होणार आहेत. यामध्ये बंगलोराचा प्रज्वल विश्वनाथ, दिल्लीचा पृथ्वी ढिलॉन, अन् दोन गोव्यातील जावेद शेख आणि जबी मुल्ला हे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

(Friendship Moto Cup Tatarstan Russia International Competition Selection of two riders from Goa)

'Friendship Moto Cup
Goa Casino : कॅसिनोंसाठी 28 टक्केच जीएसटी

या स्पर्धेत चार स्पर्धेचा कार्यक्रम चार टप्प्यात पार पडणार आहे. यासाठीचा पहिला कार्यक्रम 27 ते 28 ऑगस्ट 2022 रोजी सुरू पार पडला आहे. दुसरा कार्यक्रम 09 ते 10 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. जो काही तांत्रिक कारणामळे गोव्याच्या रायडर्सला यात सहभागी होता आले न्हवते.

परंतु उर्वरित दोन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही स्पर्धा 24 रोजी होणार आहे. 25 सप्टेंबर केमारो विवो सिटी रशियामध्ये आणि 01 आणि 2 ऑक्टोबर 2022 रशियामध्ये पार पडणार आहे. याबाबत जबी मुल्ला म्हणाला की, ह्या स्पर्धेत आम्ही दोघे सहभागी होणार असून या संधीचे सोनं आम्ही करण्यासाठी सज्ज झालो आहोत असे ही तो यावेळी म्हणाला.

'Friendship Moto Cup
Mandrem Panchayat: मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत

मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम मोटरसायकल फेडरेशन रशिया आणि FIM अंतर्गत आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी गोव्याचे दोन रायडर्स 20 सप्टेंबर 2022 रोजी गोव्याहून रशियाला रवाना होतील. यातील जबी मुल्ला हा KTM 250 यासाठी आणि जावेद शेख हा Kawasaki 250 साठी सहभागी होणार आहे.

चारही भारतीय रायडर MX2, 125CC ते 500 CC मध्ये भाग होणार आहेत. स्पर्धेच्या निकालांवर वैयक्तिक चॅम्पियन्स शर्यतींमध्ये घेतलेल्या स्थानांसाठी रायडरला दिलेल्या सर्वात अधिक गुणांद्वारे निश्चित केले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com