Goa Crime: अनुराग, साधना विरोधात आरोपपत्र दाखल; नऊ महिन्‍यांपूर्वीची वास्‍को जळीतकांड दुर्घटना

Goa Crime News: १८ नोव्‍हेबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली होती; शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान याने तक्रार दिली होती
Goa Crime News: १८ नोव्‍हेबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली होती; शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान याने तक्रार दिली होती
Fire |CrimeCanva
Published on
Updated on

मडगाव: नऊ महिन्‍यांपूर्वी नवेवाडे-वास्‍को येथे जळीतकांड घडवून आणून आपली पत्‍नी शिवानी राजवत आणि सासू जयदेवी चौहान या दोघांची हत्‍या केल्‍याचा आरोप असलेल्या नौदलाचा अधिकारी अनुराग राजवत आणि त्‍याची आई साधनासिंग राजवत यांच्‍याविरोधात वास्‍को पोलिसांनी वास्‍को न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. सासूचा खून करणे आणि पत्‍नीची हुंड्यासाठी छळ करून हत्‍या करणे असे आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आले आहेत.

१८ नोव्‍हेबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली होती. नवेवाडे-वास्‍को येथे एका फ्‍लॅटमध्‍ये राहणाऱ्या नौदल अधिकाऱ्याने मुद्दामहून गॅस चालू ठेवून आपली पत्‍नी व सासू यांच्‍या मृत्‍यूचा सापळा रचला होता असा अनुरागवर आरोप ठेवण्‍यात आला आहे.

या प्रकरणी अनुराग व साधनसिंग या दोघांवरही भादंसंच्‍या ३०२ (खून) आणि ३०४(ब) (हुंड्यासाठी छळ करून हत्‍या) असे आरोप ठेवण्‍यात आले आहेत. काल वास्‍को न्‍यायालयात हे २५० पानांचे आरोपपत्र दाखल करण्‍यात आले.

या प्रकरणात शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान याने तक्रार दिली होती. आपल्‍या बहिणीच्‍या लग्‍नावेळी सासरच्‍या लोकांकडून २० लाख रुपयांचा हुंडा मागण्‍यात आला होता. एवढी रक्‍कम दिली नसल्‍याने सासरच्‍या लोकांकडून तिचा छळ चालू होता असे या तक्रारीत म्‍हटले होते. ज्‍या दिवशी ही दुर्घटना घडली त्‍याच दिवशी शिवानी व तिची आई आपल्‍या माहेरच्‍या घरी येणार होती. पण त्‍याच दिवशी सकाळी हा स्‍फोट होऊन त्‍या दोघांचे निधन झाले होते.

याप्रकरणी सुरुवातीला अनुराग राजवत व साधना राजवत यांच्‍या विरोधात वास्‍को पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला होता. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्‍यात आले आहेत.

Goa Crime News: १८ नोव्‍हेबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली होती; शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान याने तक्रार दिली होती
Goa Crime: खंडणी की इतर काही? सव्वा वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचे कारण गुलदस्‍त्‍यात

गॅस सिलिंडरचा वापर...

अनुराग राजवत हा नौदलात काम करणारा अधिकारी असून गॅस सिलिंडर चालू ठेवला तर गॅसचे आवरण तयार होऊन या आवरणाशी आगीचा संपर्क आल्‍यास स्‍फोट होऊ शकतो याची पूर्ण माहिती असल्‍यानेच अनुरागने गॅस चालू ठेवला आणि फळे आणण्‍याच्‍या बहाण्‍याने तो बाहेर पडला असे या तक्रारीत म्‍हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com