Vasco News : गोवा सहकार भांडारच्या थकबाकीवरून मुरगाव पालिका मंडळाची बैठक गाजली

नगराध्यक्षांना विचारला जाब : कामुर्लेकर, हेन्रिक्स यांचे आरोप
Murgaon Municipal Board
Murgaon Municipal BoardGomantak Digital Team
Published on
Updated on

Vasco News : मुरगाव पालिका मंडळाची बैठक शुक्रवारी (ता.१६) विविध मुद्यांवरून गाजली. गेल्या बैठकीत मांडलेले विषय मिनिट्‌स बुकमध्ये नमूद न करता भलतेच विषय या मिनिट्‌स बुकमध्ये मांडल्याचा आरोप नगरसेवक यतीन कामुर्लेकर व फेड्रीक हेन्रिक्स यांनी आरोप करून नाराजी व्यक्त केली. तसेच आयओसी, गोवा सहकार भांडार यांच्या थकबाकीचे विषय गाजले. तसेच मार्केट कॉम्प्लेक्सवर मोबाईल टॉवर बसविण्याचा प्रस्ताव सध्या फेटाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. इतर विषयांवरही चर्चा झाली.

आजची पालिका मंडळाची बैठक पालिका कर्मचारी मिल्टन डिसोझा यांनी पालिकेत केलेल्या घोटाळ्यावरून सुरू झाली. त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई का झाली नाही, याविषयी नगरसेवकांनी पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारला. याविषयी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे उत्तर नगराध्यक्षांनी दिले.

Murgaon Municipal Board
Vasco : चिखलीतील जॉगर्स पार्कचे लवकरच उद्‍घाटन : गुदिन्हो

दुसरा विषय म्हणजे आयओसी पालिकेला थकबाकी देणे आहे. परंतु त्यांनी सदर कंपनी आरव्हीएनकॉय या कंपनीला चालवायला दिली आहे. याच्यावर नगरसेवक फेड्रीक हेन्रिक्स व यतीन कामुर्लेकर यांनी आक्षेप घेतला. तिसरा मुद्दा गोवा सहकार भांडार पालिकेला करोडो रुपये थकबाकी देणे आहे.

Murgaon Municipal Board
Vasco Fire News : हेडलॅण्ड सडा येथे टार मशीनला आग

ते भाडेही सारखे देत नाहीत, त्यामुळे व्याज वाढत जाते. महिन्याला 75 हजार रुपये भाडे भरायचे सोडून फक्त पाच हजार रुपयांचा धनादेश पालिकेला भाडे म्हणून देतात. अशांना जागा खाली करण्यास भाग पाडले तर पुढे दुसऱ्यांकडून भाडे मिळू शकते. याविषयी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी लक्ष घालावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

Murgaon Municipal Board
Vasco News : साचलेल्या पाण्यामुळे आजारांना आमंत्रण, त्वरित उपसा करा; वास्कोतील लहानग्यांचे आवाहन

बैठकीतील महत्त्वाचे विषय

  • नवीन मार्केट कॉम्प्लेक्सवर मोबाईल टॉवर बसविण्याच्या प्रस्तावावर चर्चा.

  • पालिकेतील झाड कापणाऱ्या माणसाच्या मानधनावर चर्चा.

  • हेडलॅण्ड सडा येथील मार्केट कॉम्प्लेक्स पांढरा हत्ती बनले यावर चर्चा.

  • पालिकेला ज्युनियर अभियंत्यांची कमतरता भासते यावर चर्चा.

  • गोवा सहकार भंडारकडून भाडे आणि व्याज माफ करण्याच्या प्रस्तावावर चर्चा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com