Mega Project : सावरफोंड मेगा प्रकल्‍प बेकायदा;वनाधिकाऱ्यांकडून पाहणी

Mega Project : झाडांची कत्तल करण्‍याचा डाव; काही पंचही सामील
Mega Project
Mega Project Dainik Gomantak

Mega Project :

वास्को, सावरफोंड-सांकवाळ येथील नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्‍पाच्‍या जमिनीवरील झाडे तोडण्यात आली आहेत का, याची पाहणी वनाधिकाऱ्यांनी केली. यावेळी त्‍यांना तेथील झाडे तोडलेली नाहीत, मात्र दोन दिवसांपूर्वी तेथे झाडे तोडण्यासाठी आलेल्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

वनविभागाने याकडे तातडीने लक्ष दिल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. सदर प्रकल्पासाठी गावातील काही पंचसदस्य संबंधित ठेकेदाराला ‘मदत’ करत आहेत. तर, काही समाजकंटक या गावाची ओळख पुसण्याच्‍या प्रयत्नात आहेत. पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असे स्थानिक पंच तुळशीदास नाईक यांनी सांगितले.

सावर तलाव परिसरातील खासगी वनक्षेत्रात नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्पांना ग्रामस्थांचा विरोध आहे. तेथील मेगा प्रोजेक्टला विविध परवानग्या नसल्याचा दावा लोकांनी केला आहे. या प्रकल्पाला यापूर्वीही विरोध झाला होता. आता सांकवाळ पंचायतीने परवानगी दिली आहे. पण स्थानिकांनी विरोध केल्‍यामुळे कामगारांना तेथे कर्तव्य बजावता आले नाही.

Mega Project
Goa Murder Case: पर्यटनाला वास्‍कोत आले, चोरीसाठी वृद्धेला ठार केले; 26 दिवसांनंतर आंध्रातील दोघांना अटक

वनसंपदा, जैवविविधता नष्‍ट होण्‍याचा धोका

हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काही लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. माजी मंत्री एलिना साल्ढाणा आणि स्थानिकांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

याबाबत वनविभागाकडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकल्पासाठी कोणीही परवानगी घेतलेली नाही. वनविभागाने या प्रकल्पाला परवानगी दिलेली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी घसरण झाली आहे. कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही. आम्ही सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन या प्रकाराची पाहणी करण्‍याची मागणी करणार आहोत.

- एलिना साल्ढाणा, माजी मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com