Vasco News : श्‍वानांचे निर्बिजीकरण मोहीम राबवणार

वास्कोतील बैठकीत निर्णय : दररोज 20 भटक्या श्‍वानांचे लक्ष्य
Dog
DogGomantak Digital Team

वास्को शहरातील भटक्या श्‍वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बिजीकरण मोहीम प्रखरपणे राबवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रतिदिन २० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले.

मात्र, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण कसे ठेवणार हे उघड करा, असे आवाहन संबंधितांना केले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘पीपल्स फॉर ॲनिमल’च्या प्रतिनिधींनी वाहन, चालक, कामगार तसेच निधीची कमतरता असल्याचे सांगितले.

Dog
Income Tax Return: मोदी सरकारची मोठी घोषणा, जर तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर...

येथे भटक्या कुत्र्यांनी लोकांना चावे घेण्याचे प्रकार वाढल्याने कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आमदार साळकर यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी जयंत तारी, उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, कपिल नायक, रोलंड मार्टिन्स, रेबिजविरोधी मोहिमेचे प्रतिनिधी, पीपल्स फॉर ॲनिमल संस्थेचे तसेच एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Dog
Nikki Tamboli in Goa: निक्कीने गोव्यातून शेअर केला हॉट व्हिडिओ; चाहते म्हणाले आम्हालाही...

एकाच ठिकाणी खाद्य द्यावे !

भटक्या कुत्र्यांना काहीजण कोंबडीचे टाकाऊ अवयव खाण्यासाठी घालतात. ते देण्याचे बंद झाले तर ती कुत्री खाणे न मिळाल्याने आणखी उग्र होतील. त्या भटक्या कुत्र्यांना जागोजागी खाद्यपदार्थ देण्याऐवजी एकाच ठिकाणी त्यांना खाणे द्यावे, असा विचार नगरसेवक फ्रेडिक हेन्रिक्स यांनी मांडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com