Nikki Tamboli in Goa: निक्कीने गोव्यातून शेअर केला हॉट व्हिडिओ; चाहते म्हणाले आम्हालाही...

मॉडेल अभिनेत्री निक्की तांबोळीचा गोव्यातील व्हेकेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nikki Tamboli in Goa
Nikki Tamboli in Goa Dainik Gomantak

Nikki Tamboli in Goa: बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून नावारूपाला आलेली मॉडेल अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती दररोज मनोरंजक पोस्ट शेअर करत असते. नुकतेच निक्की अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Nikki Tamboli in Goa
'गंदी बात' फेम अभिनेत्री सबा सौदागरने गोव्यात बॉयफ्रेन्ड चिंतन शाहसोबत केले लग्न; पाहा फोटो

तिने तिच्या सोशल अकाऊंटवर गोव्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील निक्कीच्या सिझलिंग अवताराने चाहत्यांचे होश उडाले आहेत. निक्कीचा हा सेक्सी स्टाइलिश अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरवेळीप्रमाणेच यावेळीही निक्कीला कौतुकासोबतच ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.

निक्की तांबोळी गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करत आहे, पण इथूनही ती चाहत्यांना सोशल मीडियातून अपडेट्स देत आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ती तो फ्लोरल बीच ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

तिने या ड्रेसमध्ये एक सेल्फी व्हिडिओ घेतला आहे आणि या व्हिडिओसोबत निकीने गॅरी संधूचे पंजाबी गाणे 'मिन्ना मिन्ना' बॅकग्राउंडमध्ये घेतले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना निकीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'गोवा वाइब्स'.

Nikki Tamboli in Goa
गोव्यात 'आप'च्या प्रचारासाठी दिले 17 कोटी रूपये; आता अडकला सीबीआयच्या जाळ्यात

या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी खूपच ग्लॅमरस दिसत असून सुट्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोक तिच्या फिगरचे रहस्य विचारत आहेत आणि अनेक चाहते तिला टिप्सही विचारताना दिसत आहेत.

काहींनी तिच्यासोबत सुटीवर आणखी कोण आले, असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी तिचा कथित बॉयफ्रेंड मनन शाह याला टॅगही केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com