Vasco Lake : वाडे-वास्कोत तळे दूषित; रोगराईची भीती; पालिकेचेही दुर्लक्ष

Vasco Lake : तळ्यातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. वाडे तळ्याचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त झाल्याचा दावा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Vasco Lake
Vasco Lake Dainik Gomantak

Vasco Lake :

वास्को, दाबोळी वाडे वास्को येथील तळ्याच्या पाण्यात दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

तळ्यातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. वाडे तळ्याचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त झाल्याचा दावा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दाबोळी मतदारसंघातील वाडे वास्को येथील तळ्याचे १५ कोटी खर्चून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तेव्हापासून हे तळे या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या या तळ्याची देखभाल होत नसल्याने तळ्याचे पाणी वर्षानुवर्षे दूषित होत चालले आहे. सदर तळे पालिका हद्दीत येत असल्याने तळ्याची देखभाल पालिकेने करणे क्रमप्राप्त होते.

मात्र मध्यंतरी तळ्यावर चर्च संस्थेने आपला हक्क दाखवल्याने या तळ्याची देखभाल कुणी करावी, हे मात्र ठरले नाही. त्यामुळे तळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. पुर्वी हे तळे चिऱ्यांच्या दगडांनी पायऱ्या बांधलेल्या स्वरूपात होते. त्यामुळे या तळ्याला नैसर्गिक रूप होते. तसेच पूर्वी या तळ्याचे पाणी दुषित होत नव्हते. कारण या तळ्याला येथे जवळच असलेल्या दर्या पर्यंत वाट होती. त्यामुळे भरती व ओहोटीमुळे दर्याचे पाणी या तळ्यात मिश्रीत होऊन परत दर्यात जायचे. त्यामुळे या तळ्यात पाणी साचून राहत नव्हते व प्रवाह तळ्यात नैसर्गिकरित्या होत होता.

Vasco Lake
Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

दुर्गंधीमुळे लोकांनी फिरवली पाठ

या तळ्याच्या सौंदर्यीकरणानंतर या तळ्यावर स्थानिक लोक सकाळ संध्याकाळी शतपावली,विरंगुळ्यासाठी येतात. तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. मात्र सध्या तळ्यात प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याने याठिकाणी थांबणे सोडा, तळ्या शेजारून चालतानाही लोकांना नाक धरून वाट काढावी लागते, एवढी असह्य दुर्गंधी तळ्याच्या परिसरात सुटलेली आहे.

त्या लोक तळ्याच्या ठिकाणी फिरकत नाहीत. रस्त्यावरून जाणारे वाहन चालक तसेच बसमधील प्रवाशांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष दिले नाहीतर या परीसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.पालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com