Missing Child Mapusa: खोर्लीमध्ये हरवलेला 2 वर्षांचा चिमुकला सुखरूप सापडला, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Missing child: खोर्ली येथे भाड्याच्या घरात राहणारा दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता हरवल्याची घटना समोर आली होती.
Missing Child Mapusa
Missing Child MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: खोर्ली येथे भाड्याच्या घरात राहणारा दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता हरवल्याची घटना समोर आली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा मुलगा सुखरूप सापडला असून तो आपल्या कुटुंबीयांकडे परतला आहे.

ही घटना खोर्ली येथे घडली होती. अमरनाथ निषाद यांचा दोन वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे मदत मागितली.

दरम्यान, संतोष गवडे आणि पराग देउळकर या स्थानिक नागरिकांना उसपकर-खोरलिम येथे एक चिमुकला रडताना दिसला. त्याच्या हालचाली पाहून तो हरवलेला असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी त्याला समजावून घेतले आणि त्वरित म्हापसा पोलीस ठाण्यात नेले.

Missing Child Mapusa
Goa Crime: बनावट हॉटेल्‍स वेबसाईट्स रॅकेटचा पर्दाफाश! अनेक ग्राहकांची फसवणूक; मध्यप्रदेशच्या तरुणाला अटक

पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुलाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर अमरनाथ निषाद यांनी आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्याचं समजले. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याची ओळख पटवण्यात आली.

सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून म्हापसा पोलिसांनी चिमुकल्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात सुखरूप सोपवलं. स्थानिक नागरिक संतोष गवडे आणि पराग देउळकर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. पोलीस प्रशासन आणि मुलाच्या कुटुंबीयांनी या दोघांचे आभार मानले.

Missing Child Mapusa
Goa Budget Session: फक्त आश्‍‍वासनेच! पुन्‍हा अल्‍पकालीन अधिवेशन; विरोधक संतप्त

ही घटना पालकांसाठी एक इशारा आहे. लहान मुलं खेळता खेळता सहज भरकटतात, त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. घराच्या परिसरात खेळताना मुलांवर बारीक नजर ठेवावी आणि अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सतर्क राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com