Vasco News : वास्को येथील जोशी चौक बनले भिकाऱ्यांचे आश्रयस्थान; सौंदर्य हरवले

Vasco News : त्वरित कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
Vasco
Vasco Dainik Gomantak

मुरगाव, वास्को रेल्वे स्थानकाच्या समोरच असलेला जोशी चौक सध्या भिकारी आणि भटक्या लोकांसाठी आश्रयस्थान बनले आहे. या भिकाऱ्यांना तेथून त्वरित हाकलून लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.

काही वर्षांपूर्वी वास्कोचे सौंदर्यीकरण करताना वास्को रेल्वे स्थानकाच्या समोरच गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावे तेथे अर्धपुतळा उभारलेला आहे. त्याचप्रमाणे, एक लहान बाग केली होती, ज्यामध्ये लहान फुलांची रोपे होती.

तेथे पाण्याचे कारंजे असलेले छोटे तलाव बांधले होते. रेल्वेतून विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना या चौकाचे दर्शन घडायचे तेव्हा त्यांना प्रसन्न वाटायचे.

Vasco
Goa Weather Update : राज्‍यात सरासरीच्‍या तुलनेत ८ टक्के पाऊस कमीच

हळूहळू काही कालावधीनंतर मळलेले कपडे, वाढलेले केस व दाढी अशा अवतारात चौकाच्या सभोवताली भिकारी व भटके लोक बसू लागले आहेत. आपले कपडे व इतर साहित्य ते तेथेच ठेवतात. तसेच दिवसभरातील व्यवहारही ते येथेच उरकतात.

यामुळे येथे गलिच्छ वातावरण पसरलेले असते. या लोकांनी या चौकाला आपले आश्रयस्थानच बनविले आहे. यासंदर्भात वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही.

पर्यटकांची सतावणूक सुरूच

जोशी चौकाच्या आतमध्ये असलेल्या छोटेखानी तलावाचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. तसेच या बागेत सगळीकडे कचरा साचलेला आहे. अनेकवेळा येथे असलेले भिकारी लोक पैशांसाठी पर्यटकांसोबत वादही करतात. मध्यंतरी या लोकांना पोलिस पकडून नेत असत.

त्यानंतर पोलिस दोषारोपपत्र दाखल करून कोर्टात हजर करत असत. त्यानंतर न्यायालय माफक दंड आणि दोन दिवस पोलिस कोठडी सुनावत असे. मात्र, सुटका झाल्यानंतर हे लोक त्यांचे दुष्कृत्य सुरूच ठेवत.

Vasco
Mumbai Goa Highway: काळ आला होता पण...दैव बलवत्तर म्हणून रूपाले कुटुंब बचावले

जोशी चौक हे येथील एक उत्तम ठिकाण आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याचे प्रथम दर्शन होत असे. मग एक छोटी बाग आणि एक तलाव पाहून उत्साह निर्माण व्हायचा. मात्र, आता ही बाग आणि आजूबाजूचा परिसर दयनीय झाला आहे. जोशी चौकाच्या स्थितीकडे कोणाचेही लक्ष नाही. भिकारी आणि इतर लोक त्याचा गैरवापर करत आहेत. स्थानिकांना, विशेषत: महिलांना येथून जाणे कठीण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- सुलभा शिंदे, हेडलँड-सडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com