Vasco Industrial Fire Safety: वास्कोतील आगीने वाजवली धोक्याची घंटा; औद्योगिक सुरक्षेसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची मागणी

Special Industrial Fire Brigade Goa: वास्को येथील मार्केटमध्‍ये लागलेल्‍या भीषण आगीमुळे अनेक प्रश्‍‍न ऐरणीवर आले आहेत.
Special Industrial Fire Brigade Goa
Vasco Industrial Fire SafetyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: येथील मार्केटमध्‍ये लागलेल्‍या भीषण आगीमुळे अनेक प्रश्‍‍न ऐरणीवर आले आहेत. वास्को हे बंदर शहर असून येथे कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि रासायनिक सामग्रीची हाताळणी व साठवणूक होते. त्यामुळे मोठ्या औद्योगिक दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन सरकारने तातडीने आपत्कालीन यंत्रणा बळकट करण्‍याची मागणी होत आहे.

नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमॉईस यांनी अग्निशमन यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्न उपस्थित केले. व्यावसायिक परिसरातील आग वेळीच नियंत्रणात आणण्यात अडचणी येत असतील, तर ती आग धोकादायक औद्योगिक साठवणूक क्षेत्रापर्यंत पोहोचल्यास काय होईल? अग्निशमन दलाची प्रतिसाद वेळ, उपकरणे, मनुष्यबळ आणि कार्यान्वयन सज्जतेचे स्वतंत्र मूल्यांकन करण्याची गरज सिमॉईस यांनी व्यक्त केली.

Special Industrial Fire Brigade Goa
Goa Mining: सावर्डेत खनिज वाहतुकीला ब्रेक! 70 ट्रक स्थानिकांनी रोखले; बाहेरील ट्रकांना विरोध

आग खारीवाडा परिसरात पसरली असती तर मच्छीमारांच्या बोटी, जाळी, इंजिन आणि मासेमारीची अन्य साधने नष्ट होण्याचा धोका होता. ही साधने म्हणजे मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असल्याने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले.

वास्को येथे पेट्रोलियम आगी, रासायनिक दुर्घटना आणि विषारी गळती हाताळण्यासाठी विशेष औद्योगिक अग्निशमन केंद्र स्थापन करावे. आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि रासायनिक संरक्षण साधनांसह आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारावी, अशी मागणी सिमॉईस यांनी केली.

Special Industrial Fire Brigade Goa
Vibrant Goa Summit: गोव्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक, 30 हजार नोकऱ्यांचे लक्ष्य; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

मोठ्या दुर्घटनेची वाट पाहू नका : ओलेन्सियो सिमॉईस

वास्कोतील आग हा सरकारसाठी गंभीर इशारा असल्याचे सांगत, अमोनिया किंवा पेट्रोलियम टाक्‍यांपर्यंत आग पोहोचण्याची वाट पाहू नये, असे सिमॉईस यांनी बजावले. कामगार, छोटे व्यापारी, रहिवासी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्या सुरक्षेला विकास नियोजनात प्राधान्य देऊन सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच वास्कोसाठी स्वतंत्र औद्योगिक अग्निशमन केंद्र हवे, अशी मागणी सिमॉईस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.