Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Vasco News : चिखली पंचायतीकडून आल्तो दाबोळीला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला पूर्वी नैसर्गिक खड्डा होता. तो खड्डा बुजवून तेथे बिल्डरने नव्या शॉपिंग मॉलसाठी पार्किंगसाठी जागा तयार केली आहे.
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, दाबोळी - चिखली पंचायत क्षेत्रात एका इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरने खड्डा बुजवून अवैधपणे वाहन पार्किंगसाठी जागा हडप केल्याचे उघड झाले आहे.

चिखली पंचायतीकडून आल्तो दाबोळीला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला पूर्वी नैसर्गिक खड्डा होता. तो खड्डा बुजवून तेथे बिल्डरने नव्या शॉपिंग मॉलसाठी पार्किंगसाठी जागा तयार केली आहे.

Vasco
Goa Election 2024: PM मोदी, CM सावंत यांच्यावर कारवाई करा; गोवा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे का केलीय तक्रार?

चिखली कृती समितीने बिल्डर लॉबी विरोधात आंदोलन छेडले होते. राज्य जलस्त्रोत विभाग, चिखली पंचायत, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण, मुरगाव गटविकास अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

‘गोवा फर्स्ट’ ची तक्रार

आल्त दाबोळी येथील खड्डा बुजवून पार्किंग जागा करणाऱ्या ‘त्या’ बिल्डरविरोधात ‘गोवा फर्स्ट’ या ‘एनजीओ’ने, चिखली पंचायत, मुरगाव मामलेदार कार्यालय, मुरगाव गटविकास अधिकारी, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य वन विभाग, राज्य जलस्त्रोत विभागा बरोबर इतर संबंधित विभागात रितसर तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com