वास्को हिंदुस्थान पेट्रोलियमने 15 टक्के व्याजाचा विचार करावा

मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला ठराव
Mormugao municipality
Mormugao municipalityDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोतील हिंदुस्थान पेट्रिलियम महामंडळाच्या आपल्या ताब्यात असलेली नऊ हजार सातशे चौरस मीटर्सपेक्षा अधिक जमीन मुरगाव पालिकेकडे सोपविण्यास तसेच वन टाईम सेंटलमेंट धर्तीवर 7 कोटी 93 लाख रुपये थकबाकी देण्यास राजी झाले आहे. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियमने 12 टक्क्यांऐवजी 15 टक्के व्याजाचा विचार करावा, असा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्याचा ठराव मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सदर ठराव मान्यतेसाठी पालिका प्रशासन संचालनालयकडे पाठविण्यात येणार आहे. (Vasco Hindustan Petroleum to reduce interest rates; Resolution presented in Mormugao municipality )

Mormugao municipality
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांचा अपमान

मुरगाव पालिकेने 1997 ला पेट्रोलियमला भाडेपट्टीवर दिली होती. भाडेपट्टीच्या थकबाकीवर 4 टक्के व्याज आकारण्यात येणार होते. त्यानंतर 2004 मध्ये व्याजाचा दर प्रतिवर्ष पाच टक्क्यावर नेण्यात आला. परंतु पालिका कायद्यानुसार व्याजाचा दर 18 टक्के आहे. तो 2003 पासून लागू करण्यात आला होता. मुरगाव पालिकेने जी जागा भाडेपट्टीवर दिली होती.

त्या जागेसंबंधी प्रत्येक तीन वर्षानंतर नूतनीकरण करण्याची गरज होती. परंतू नूतनीकरण करण्याचे काम अधिकारी वर्गाकडून झाले नाही. मुरगाव पालिकेच्या अधिकारीवर्गाच्या एकंदर निष्काळजीपणामुळे मुरगाव पालिकेला मोठ्या रक्कमेवर पाणी सोडावे लागले याला जबाबदार कोण आहे, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

Mormugao municipality
एसटीना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार : विजय सरदेसाई

आता हिंदुस्थान पेट्रोलियमने वन टाईम सेटलमेंट करताना 2004 ते 2022 पर्यंतची रक्कम 12 टक्के व्याजाने फेडण्यास सहमती दाखविली आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेच्या तिजोरीत सुमारे आठ कोटी रुपये जमा होतील. काहीच्या मते 2003 पासून 18 टक्के दराने व्याज आकारले असते, तर ती रक्कम तीस कोटीच्या आसपास होते. परंतु पूर्वीच्या मुरगाव पालिका मंडळाने नीट लक्ष दिले नाही. त्यामुळे पालिकेला मोठी रक्कम पदरी पाडून घेता आली नाही.

आता हिंदुस्थान पेट्रोलियमने वन टाईम सेटलमेंट 12 टक्के व्याजा ऐवजी 15 टक्के व्याजाने रक्कम फेडावी, असा ठराव पालिका मंडळाने शनिवारी (ता. 15) झालेल्या बैठकीत घेतला आहे. आता पालिका प्रशासन संचालनालय या ठरावावर कोणता निर्णय घेते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहे.

येथे पालिका गॅरेजच्या जागी बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या नियोजित पार्किंग प्रकल्पाऐवजी तेथे कमर्शिअल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी त्या प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करण्याची सूचना संबंधित वास्तुविशारदला करण्यात येणार आहे. इतर महत्वाच्या गोष्टींसंबंधी चर्चा करून काही निर्णय घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com