राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांचा अपमान

ॲन्थनी बार्बोझा यांचा आरोप : काँग्रेस प्रवक्ते अजय कुमार यांच्या विरोधात तक्रार
Complaint file in Maina Curtorim Police Station
Complaint file in Maina Curtorim Police StationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय कुमार यांनी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा दावा करून गोवा भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष ॲन्थनी बार्बोझा यांनी मायणा- कुडतरी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.

Complaint file in Maina Curtorim Police Station
एसटीना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार : विजय सरदेसाई

कुमार यांनी मुर्मू यांच्या उमेदवारीला विरोध करताना त्या वाईट विचारसरणीच्या आहेत, असे म्हटले होते. मुर्मू या एसटी समाजाच्या उद्धारासाठी वावरणाऱ्या नेत्या असून त्यांचा अपमान केल्याने तमाम एसटी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचे बार्बोझा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्याकडे बार्बोझा यांनी ही तक्रार दिली. यावेळी त्यांच्यासोबत एसटी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष प्रभाकर गावकर, कामील बार्रेटो, मोहन गावकर, मॅन्युएल बार्बोझा, क्लेमेंट डायस आणि मिनीन क्वाद्रुश उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com