वास्को, येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती मुरगावतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री दामोदर मंदिराकडून निघालेल्या या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुरवातीला ग्रामदैवत श्री देव दामोदर चरणी अध्यक्ष योगेश शेट तानावडे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले. या प्रसंगी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, समितीचे पदाधिकारी राजेश शिरोडकर, नितीन फळदेसाई, कृष्णराव बांडोदकर, रामकृष्ण होन्नावरकर, सुरेश नाईक, सविता सातार्डेकर, रूपा नाईक, मेधा च्यारी, कलाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाचा चित्ररथ, भजनी मंडळ पथक, दिंडीचा सहभाग होता. मुरगावमधील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. होता. स्वतंत्र्यपथ मार्गावरून शोभायात्रा मुरगांव पालिका इमारतीसमोर आल्यावर समारोप झाला. समारोप सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर तसेच डॉ. शांताराम सुर्मे व डॉ. धर्मेश प्रभुदेसाई यांची विशेष उपस्थिती होती.
बेतकेकर यांनी देशावर चाललेल्या विविध प्रकारच्या बौद्धिक आक्रमण, संस्कृती व परंपरा यावर होणारे आघात, देशाचा विदेशी शक्तीने रचलेला खोटा इतिहास यावर भाष्य केले. डॉ. शांताराम सुर्मे व डॉ. धर्मेश प्रभुदेसाई यांची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी श्री विद्या प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित दिनदर्शिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ट पत्रकार नविन झा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष योगेश शेट तानावडे यांनी स्वागत केले. नितीन फळदेसाई यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन सुरेश नाईक यांनी केले. पाहुण्यांची ओळख विजय हजारे यांनी करून दिली. आभार साईनाथ नाईक यांनी मानले. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संरक्षक कृष्णराव बांदोडकर, सचिव रामकृष्ण होन्नावरकर, सहसचिव सुरेश नाईक,
उपाध्यक्ष मारुती देसाई, साईनाथ नाईक, कोषाध्यक्ष राजेश शिरोडकर, सहकोशाध्यक्ष आनंद गुरव, सभासद सखाराम भगत, विजय हजारे, नीरज राऊळ, संजय नाईक, तुषार परब, दत्ता आगापूरकर, श्याम कान्होजी, दिलीप मावळणकर आदींची उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.