Goa Assembly Session: जयंतीदिवशी लोकमान्य टिळकांना गोवा विधानसभेत अनोखी आदरांजली, वास्कोच्या आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी क्षणात केली मान्य 

Vasco Ground Rename: वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वास्कोमधील प्रसिद्ध टिळक मैदानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला
Goa politics news
Goa politics newsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वास्कोमधील प्रसिद्ध टिळक मैदानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हा प्रस्ताव इतका आवडला की, त्यांनी तो तात्काळ मान्य केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, ही एक औचित्याची बाब ठरली.

मैदानाला टिळकांचे संपूर्ण नाव देण्याचा प्रस्ताव

अधिवेशनात प्रस्ताव मांडताना आमदार साळकर यांनी सांगितले की, वास्कोच्या मैदानाचे नाव टिळकांच्या नावावरून 'टिळक मैदान' ठेवण्यात आले आहे. मात्र, लोकमान्य टिळकांचे कार्य अफाट आणि महान होते. केवळ एका नावाने त्यांच्या कार्याचा गौरव पूर्ण होणार नाही.

Goa politics news
Goa Assembly Live: बेघरांसाठी गोव्यात नवी गृहनिर्माण योजना: मुख्यमंत्र्यांची घोषणा

त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहावी, यासाठी या मैदानाचे नाव 'केशव बाळगंगाधर टिळक' असे संपूर्ण असावे, अशी विनंती त्यांनी केली. यासोबतच, लोकमान्य टिळकांचा एक भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही आमदार साळकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मंजुरी आणि कौतुक

आमदार साळकर यांचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खूपच भावला. लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव तात्काळ मान्य केला.

"लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या महान कार्याचे स्मरण केल्याबद्दल आमदार साळकर यांचे आभार," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विनंतीला त्वरित मंजुरी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com