Vasco Fish Market
Vasco Fish MarketDainik Gomantak

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Vasco New Fish Market: एकीकडे सदर मार्केट प्रकल्पाचे येत्या २५ रोजी नगरविकास मंत्री विश्र्वजित राणे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी जाहीर केले आहे.
Published on

वास्को: नव्याने बांधण्यात आलेल्या मासळी मार्केटमध्ये जोपर्यंत सायबिणीची विधिवत स्थापना होत नाही, तसेच इतर ठिकाणी होणारी मासेविक्री बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही मासे मार्केटात जाणार नाही, असा पवित्रा मासे विक्रेत्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत,तर आम्ही मुरगाव पालिका इमारतीसमोरच्या रस्त्यावर मासे विक्री करू, असा इशाराही दिला.

एकीकडे सदर मार्केट प्रकल्पाचे येत्या २५ रोजी नगरविकास मंत्री विश्र्वजित राणे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी मासे विक्रेत्यांनी नव्या मार्केटात जाण्याची तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

येथील जुन्या बस स्थानकासमोरील बैठे व पत्र्याचे छप्पर असलेले मासळी मार्केट पाडून तिथे नवीन अद्ययावत मार्केट मुरगाव पालिकेने बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तत्कालीन नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्या कार्यकाळात मुरगाव पालिकेने खर्चाची रक्कम आपल्या निधीतून ‘सुडा’ला दिली होती. त्यानंतर तेथील मासे विक्रेत्यांची समजूत काढून त्यांना मार्केट खाली करण्यासाठी आमदार साळकर यांनी पुढाकार घेतला होता.

मासळी विक्रेते आणि पालिका यांच्यात समझोत्यासाठी मुरगाव पालिका व मासे विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर त्या मासे विक्रेत्यांना साळगावकर इमारतीसमोरच्या रिकाम्या जागेत उभारलेल्या शेडमध्ये मासे विक्रीसाठी जागा दिली होती. त्यासाठी मुरगाव पालिका वर्षाला पाच लाख रुपये महसूल खात्याला भाडेपट्टीसाठी देते.

Vasco Fish Market
Ponda Fish Market: 'आजच दुकाने खाली करा'! पालिकेमुळे फोंडा मासळी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा गोंधळ; मुख्यमंत्र्यांचे सहकार्य

खारीवाड्यात घाऊक विक्री सुरूच!

खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात तेथे पोलिस असतानाही सदर व्यवसाय सुरू आहे. सायंकाळच्या वेळी तेथे मासे खरेदीसाठी गर्दी असते. ते पूर्णपणे बंद होण्याची गरज आहे. मासे विक्री फक्त मार्केटातच झाली पाहिजे, इतर ठिकाणीनव्हे. मागण्या मान्य झाल्या नाही, तर त्या मार्केटात न बसता आम्ही रस्त्यालगत तसेच प्रसंगी मुरगाव पालिका इमारतीसमोर रस्त्यावर मासे विक्री करू, असा इशारा दुलासिन यांनी दिला.

Vasco Fish Market
Margao Fish Market: मडगाव मासळी मार्केटची इमारत बनली दारूअड्डा! उदघाटनापूर्वीच विक्री सुरू; देखरेख मागणी

आम्हाला माहितीच नाही!

सदर प्रकल्प २५ सष्टेंबरला लोकार्पण करण्यात येणार आहे यासंबंधीची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांतून सदर माहिती मिळाल्याचा दावा मासे विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्ष दुलासिन यांनी केला.आमच्या सायबिणीला मार्केटात घेतल्याशिवाय आम्ही आत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला या मार्केटच्या नोटिफिकेशनची प्रत दिलेली नाही. आम्ही वजन व वाटा पध्दतीने मासे विक्री करतो. रस्त्यावर मासे विकणाऱ्यांना मार्केटात सामावून घेण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी येथे आपला व्यवसाय करावा, असेही यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com