Goa Politics: पक्षप्रवेशासाठी कोणतीही अट असू नये, अशी आमची अट; आल्मेदांच्या प्रवेशानंतर तानावडेंचे स्पष्टीकरण

Goa Politics: भाजप सोडून गेलेले अन्य नेतेही आमच्या संपर्कात आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये येणे सुरू होईल.
Goa Politics
Goa Politics

Goa Politics

लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर भाजपने आपल्या बंडखोर नेत्यांना पक्षाची कवाडे सताड उघडली आहेत. येत्या काही दिवसांत आणखीन काही नेते भाजपमध्ये फेरप्रवेश करतील असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वास्को मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने काँग्रेस पक्षात जाऊन निवडणुकीत तब्बल 9 हजार 461 मते घेतलेल्या कार्लुस आल्मेदा यांना त्यांनी आज भाजपमध्ये फेरप्रवेश दिला.

अन्य सक्षम राजकीय पर्याय नसल्याने साऱ्यांनाच भाजपमध्ये यायचे आहे. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा आदी नेते उपस्थित होते. तानावडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, आल्मेदा भाजपमधून गेले तरी ते संपर्कात होते. वास्कोत गेल्यावर आल्मेदा यांना न भेटता परत येण्याचे वाईट वाटत होते. त्यामुळे फोनवर आम्ही बोलत असू, असे दाजी साळकर यांनी सांगितले.

दाजी साळकरांनी केली मध्यस्थी

भाजप सध्या आपल्या बंडखोर नेत्यांच्या संपर्कात असून त्यांनी विनाअट पक्षात प्रवेश करावा यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे मतदारसंघ पातळीवर हे सारे केले जात आहे. आल्मेदा यांच्याशी आमदार दाजी साळकर यांनी संपर्क साधला होता. ते आल्मेदा यांना भेटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'विकसित भारत' हे स्वप्न साकार करण्यासाठी आल्मेदा यांनी भाजपसोबत यावे असे आवाहन केले.

Goa Politics
Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचे हत्या प्रकरण; आई सूचना सेठ विरोधात 642 पानी आरोपपत्र दाखल

"भाजप सोडून गेलेले अन्य नेतेही आमच्या संपर्कात आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये येणे सुरू होईल. सध्या पक्षप्रवेशासाठी कोणतीही अट असून नये, अशी आमची अट आहे," असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

"मी आमदार असताना अनेक कामांचे प्रस्ताव सादर केले होते. विद्यमान आमदार दाजी साळकर यांनी त्या कामांचा पाठपुरावा करून ती पूर्ण केली. त्यामुळेच आपण भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला," असे पक्ष प्रवेशाचे स्पष्टीकरण कार्लुस आल्मेदा यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com