Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचे हत्या प्रकरण; आई सूचना सेठ विरोधात 642 पानी आरोपपत्र दाखल

Candolim Murder Case: जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सूचनाने गोव्यात येत कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्याच मुलाची हत्या केली.
Suchana Seth
Suchana SethDainik Gomantak
Published on
Updated on

Candolim Murder Case

आपल्याच चार वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आई सूचना सेठ (Suchana Seth) विरोधात कळंगुट पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. 642 पानी आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सूचनाने गोव्यात येत कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये आपल्याच मुलाची हत्या केली. सूचना जानेवारीपासून तुरुंगात आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, आता पुढील कारवाई न्यायालयात होणार आहे.

गोवा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, यात 59 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. न्यायालयाने वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी कशी दिली यामुळे सूचना नाराज होती. सूचनाला कोणत्याही परिस्थितीत मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर ठेवायचे होते. हेच या हत्येचे कारण ठरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुलाचा मृतदेह सापडलेल्या बॅगमध्ये टिश्यू पेपरवर लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांनी आढळली होती. जप्त करण्यात आलेली चिठ्ठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

मुलाला वडिलांकडे परत जायचे नव्हते. मुलाला वडिलांकडे पाठवले नाही तर मला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत ​​आहेत माझा पती आणि कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश देत होते. मला मुलाला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग सापडत नव्हता आणि मला ते सहनही होत नव्हते, असे या चिठ्ठीत लिहल्याचे समोर आले आहे.

Suchana Seth
Deepak Sharma Suspended: महिला फुटबॉलपटूंचा विनयभंग; AIFF ची दीपक शर्माविरुद्ध मोठी कारवाई

या चिठ्ठीमुळे हत्येमागील हेतू निश्चित करण्यात मदत होऊ शकते, असे पोलिसांचे मत आहे. मात्र, सूचनाचे पती व्यंकटरमण यांचे वकील अझहर मीर यांनी 'हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि आरोपीच्या हस्ताक्षराच्या नमुन्याशी जुळण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.

सूचना डोक्याने हुशार आणि तपासाची दिशाभूल करण्यास सक्षम आहे, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com