Londa To Goa: लोंढा-गोवा मार्गावर एक्स्प्रेसचा डबा घसरला! पावसाचा परिणाम; वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत

Vasco Da Gama Yesvantpur Express Derailment: वास्को द गामा येथून अपघात निवारण रेल्वे घटनास्थळी दाखल झाली होती. नैऋत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
Derailment
Train DerailmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नैऋत्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हुबळी विभागातील लोंढा-गोवा मार्गावरील कारंझोळ ते कॅसलरॉक दरम्यान रविवारी (ता. २५) पहाटे अडीचच्या सुमारास वास्को द गामा-यशवंतपूर एक्स्प्रेस (१७३१०) चा एक डबा रुळावरून घसरला. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

रेल्वे विभागाने तातडीने मोहीम हाती घेत सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत केली. मात्र, तोपर्यंत या मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.

वास्को द गामा येथून अपघात निवारण रेल्वे घटनास्थळी दाखल झाली होती. नैऋत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रुळाची तपासणी करण्यात आली. रुळ दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. वाहतूकही सुरळीत सुरू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Derailment
West Bengal Train Accident Video: पश्चिम बंगालमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक, रुळावरून 12 डबे घसरले; सततच्या अपघातांमुळे प्रवासी संतापले

रेल्वेचा डबा घसरल्यानंतर तातडीने विविध गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. सकाळी साडेसहाला सुटणारी वास्को द गामा-शालीमार एक्स्प्रेस दोन तास उशिराने सोडण्यात आली. हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा (१२७८०) लोंढा येथे थांबविण्यात आली.

लोंढा ते गोवा दरम्यान सुमारे २७ किलोमीटरचा ब्रॉगेंझा घाट मार्ग आहे. या मार्गावर दरड कोसळणे किंवा रेल्वे रुळावरून घसरण्याचे प्रकार वारंवार घडतात. गत तीन वर्षांत दोन वेळा या मार्गावर अशा घटना घडल्या आहेत.

Derailment
Odisha Railway Accident : ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात; बारगडमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले

मंजुनाथ कनमाडी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे

कारंझोळ ते कॅसलरॉक दरम्यान रेल्वेचा डबा रुळावरून घसरला होता. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळपर्यंत काम पूर्ण झाले. रुळ वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर वाहतूक सुरुरू झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com