West Bengal Train Accident Video: पश्चिम बंगालमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक, रुळावरून 12 डबे घसरले; सततच्या अपघातांमुळे प्रवासी संतापले

Bankura train Accident: या अपघातामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
West Bengal Train Accident Video
West Bengal Train Accident VideoDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Train Accident Video: पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथील ओंडा स्थानकात लूप लाइनवर मालगाडी उभी होती. दरम्यान त्याच रुळावर दुसरी मालगाडी येऊन रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली.

या अपघातात दोन्ही मालगाड्यांचे एकूण 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात चालत्या मालगाडीचा चालक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मालगाडी बांकुराहून बिष्णुपूरला जात होती. अपघात एवढा भीषण होता की मालगाडीचे डबे रुळावरून वेगळे होऊन एकमेकांवर चढले. त्याचबरोबर या दुर्घटनेमुळे रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

याचा एक व्हिडिओही समोर आला असून, रेल्वेचे इंजिन रुळावरून पलटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याचबरोबर मालगाडीच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्याचेही दिसत आहे.

या सततच्या अपघातांमुळे देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी एका ट्विटर यूजरने ट्विटमधून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. "तो म्हणाला, एका आठवड्यापेक्षा कमी वेळेत दुसरा अपघात. यावेळी दोन मालगाड्यांची धडक झाली. जर या मालगाड्यांच्या जागी प्रवाशी गाड्या असत्या तर, याचा विचारच न केलेला बरा."

West Bengal Train Accident Video
Time of Day (ToD): ग्राहकांची सुटका की फटका? आता दिवस अन् रात्रीसाठी आकारले जाणार, वेगवेगळे वीज बिल; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

14 गाड्या रद्द

या घटनेनंतर खरगपूर-आद्रा दरम्यान धावणाऱ्या 14 गाड्या रद्द करण्यात आल्या, तर तीन गाड्या वळवण्यात आल्या, तर दोन गाड्यांचे स्थानक बदलण्यात आले.

या अपघातामुळे पुरुलिया हावडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या राहिल्या. पोरबंदर संत्रागाछी एक्स्प्रेस पुरुलिया स्थानकावरून चंडील टाटानगर मार्गे वळवण्यात आली आहे.

अपघातामुळे आणखी काही गाड्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

West Bengal Train Accident Video
Anna Ellis and David Cottle: जंगलात सोडून दिलेल्या चिमुकलीचे कुत्र्यांनी तोडले होते लचके; तीन लेकींचे आई-बाप आता घडवणार इलियानाचेही आयुष्य

घटनास्थळी रेल्वे अधिकारी

या रेल्वे अपघाताची चौकशी रेल्वे अधिकारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी हजर आहे. ज्या डब्यांचे जास्त नुकसान झाले आहे ते रुळावरून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

हा अपघात मालगाड्यांऐवजी पॅसेंजर गाड्यांमध्ये झाला असता, तर अधिक जीवित व वित्तहानी झाली असती, अशी चर्चा काही लोक या अपघाताबाबत करताना दिसली. ओडिशातील बालासोर येथे नुकताच मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com