Vasco: 'हे डबल इंजीन नसून डबल धोका सरकार'! LOP युरींचा घणाघात; वास्को ‘घोस्ट टाऊन’ बनवण्याचा डाव असल्याचा आरोप

Yuri Alemao: दाबोळी विमानतळ उजाड केल्यानंतर आता वास्को शहरालाही ‘घोस्ट टाऊन’ बनवण्याचा सरकारचा डाव असल्‍याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केला.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी विमानतळ उजाड केल्यानंतर आता वास्को शहरालाही ‘घोस्ट टाऊन’ बनवण्याचा सरकारचा डाव असल्‍याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केला. भविष्यात गोव्यात ४३ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा हाताळणीचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. त्‍यामुळे गोव्याचे पर्यावरण, पर्यटन व स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुरगाव काँग्रेस गटाच्या पत्रकार परिषदेत आलेमाव बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नियाझी शेख, ओबीसी विभागाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर, स्थानिक नेते व माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, मुरगाव युवा काँग्रेसचे अध्यक्ष साईश आमेरकर,

Yuri Alemao
Yuri Alemao: 2047 पर्यंत गोव्यात काही शिल्लक राहील का? युरी आलेमाव यांचा सरकारला सवाल

वास्को युवा काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश कंळगुटकर, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पीटर डिसोझा, दक्षिण गोवा महिला अध्यक्ष ममता आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती. पाटकर यांनी रेल्वे दुपदरीकरण सरकारच्या धोरणावर हल्ला चढवला.

Yuri Alemao
Goa Congress Protest: अमित पाटकरांसह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आझाद मैदानाजवळ काँग्रेसचा निषेध मोर्चा अडवला Watch Video

हे डबल इंजीन सरकार नसून ‘डबल धोका’ सरकार आहे. सरकार कोळसा न वाढविण्याचे सांगते; मात्र एका कंपनीकडून हाताळणी ५ दशलक्षांवरून १५ दशलक्ष टनांपर्यंत नेली जाते. मुख्यमंत्री याबाबत स्पष्टीकरण देतील का?

मुरगाव बंदरात एकाच फेरीत दोन लाख टन कोळसा आणणारी जहाजे येणार आहेत. हा गोव्याचा विध्वंस करण्याचा डाव असून, त्‍यास सर्वांनी एकजूट होऊन विरोध करणे आवश्यक आहे.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com