वास्को-चेन्नई मध्य रेल्वे 26 ऑगस्‍टपासून सुरू

वास्को ते डॉ. एमजीआर चेन्नई रेल्वे 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: वास्को (Vasco) ते डॉ एमजीआर चेन्नई (Chennai) आणि डॉ. एमजीआर चेन्नई मध्य ते वास्को येथे येणारी ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वे (Southwestern Railway) सेवा पुन्हा सुरू झाली आहे. वास्को ते डॉ. एमजीआर चेन्नई रेल्वे 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

ही रेल्वे दुपारी अडीच वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता ती निश्चित स्थळी पोहचणार आहे. डॉ. एमजीआर चेन्नई मध्य ते वास्कोला जाणारी रेल्वे 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ही रेल्वे दुपारी 3 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता पोहचणार आहे.

Indian Railway
Goa Liberation: षष्ठ्यब्दीपूर्तीचे कार्यक्रम ठरता ठरेनात!

वास्को ते डॉ. एमजीआर चेन्नई मध्य ही रेल्वे मडगाव, सावर्डे- कुडचडे, कॅस्टल रॉक, लोंढा, धारवाड, एसएसएस हुबळी, एसएमएम हावेरी, राणीबेन्नुर, हरिहर, दवांगेरे, बिरुर, आर्शिकेरे, टिपटूर, तुमकुरु, यशवंतपुर, बनसवादी, कृष्णाराजापुरम, बंगरपेट, जोलारपट्टाई, कातपडी, अराक्कोनम आणि पेरामबीर आदी स्थानकावर थांबा घेणार आहे. तर, डॉ एमजीआर चेन्नई सेंट्रल ते वास्को ही रेल्वे अराक्कोनम, कातपाडी, जोलारपट्टाई, बंगरपेट, कृष्णाराजापुरम, बनसवादी, यशवंतपूर, तुमकुरु, टिपटूर, आर्शिकेरे, बिरुर, दवांगेरे, हरिहर, राणीबेन्नूर, एसएमएम हावेरी, एसएसएस हुबळी, धारवाड, लोंढा, कॅस्टलरॉक, कुळे, सावर्डे- कुडचडे आणि मडगाव आदी स्थानकावर थांबणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com