वरूणापुरी-शांतीनगर दरम्यानचा महामार्ग बनला 'डंपिंग यार्ड; एनएचएआय, पालिकेची डोळेझाक; संबंधितांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष

Vasco: वरुणापुरी-मांगोरहिल ते शांतीनगर दरम्यानचा महामार्ग बांधकामाचे टाकाऊ साहित्याचे ‘डंपिंग यार्ड’ बनू लागले आहे.
Garbage dumping on Varunapuri to Shantinagar road
Garbage dumping on Varunapuri to Shantinagar roadDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वरुणापुरी-मांगोरहिल ते शांतीनगर दरम्यानचा महामार्ग बांधकामाचे टाकाऊ साहित्याचे ‘डंपिंग यार्ड’ बनू लागले आहे. याप्रकरणी महामार्ग प्राधिकरण वा मुरगाव पालिका संबंधितांवर कारवाई करण्यास कचरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरुणापुरी-मांगोरहिल चौकातील ते टाकाऊ साहित्य दिवसेंदिवस वाढत असून,टाकाऊ साहित्य महामार्गाच्या शोल्डर रस्त्यापर्यंत पोहचले आहे.

एकीकडे महामार्ग प्राधिकरण येथील दाबोळी विमानतळ ते बिर्ला वेर्णा चौकपर्यंतच्या महामार्गावरील कचरा उचलण्याचे कंत्राट देत आहे. तो भाग स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड आहे.

तर दुसरीकडे वरुणापुरी-मांगोरहिल ते शांतीनगर दरम्यानचा महामार्गालगत दुतर्फा टाकाऊ बांधकाम साहित्य, कचरा नजरेस पडत आहे.तो उचलण्यासाठी किंवा संबंधितांविरोधात कारवाईसाठी प्राधिकरण कोणतीही पाऊल उचलत नाही. प्राधिकरणातर्फे असा दुजभाव का होतो, हे समजणे कठिण झाले आहे.

Garbage dumping on Varunapuri to Shantinagar road
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

वरुणपुरी-मांगोरहिल चौकातील पोलिस बूथमागे असलेल्या रस्त्याकडेला माती, दगड, सिमेंट क्राँकीट वगैरे बांधकामाचे टाकाऊ साहित्य टाकले जाते . याप्रकरणी कोणीच दखल न घेतल्याने तो भाग टाकाऊ साहित्य टाकण्याचे ठिकाण झाले आहे.

Garbage dumping on Varunapuri to Shantinagar road
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

येथे ठिकठिकाणी बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे बांधाकामांचे टाकाऊ साहित्य तेथे सर्रासपण टाकण्यात येत आहे. तेथे पोलिस बूथ असूनही संबंधितांवरिधात कारवाई करीत नाही.त्यामुळे तेथे दिवसेंदिवस टाकाऊ बांधकाम साहित्याचे प्रमाण वाढत आहे.

तेथे टाकाऊ बांधकाम साहित्याचा ढीग तयार होऊ लागले आहेत. काही साहित्य तर शोल्डर रस्त्यालगत आले आहे.संबंधित सरकारी यंत्रणांनी यासंबंधी दखल घेतली नाही,तर ते साहित्य रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com