Vasco News : वरुणापुरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन पोलिस चौकीचे उद्‌घाटन

Vasco News : मुख्यमंत्र्यांनी मांगोरहिल (वरुणापुरी) येथील नवीन पोलिस चौकीचे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, मुख्य पोलिस ठाण्यापासून लांब अंतरावरील गुन्हे, तसेच असामाजिक घटनांवर नियंत्रण आणणे काही वेळा शक्य होत नाही.

त्यामुळे आऊट पोस्टच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यात येतो. मांगोर (वरुणापुरी) येथे गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लवकरच कर्मचारी तैनात करून चौकी कार्यान्वित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मांगोरहिल (वरुणापुरी) येथील नवीन पोलिस चौकीचे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आदी उपस्थित होते.

Cm Pramod Sawant
Goa News : अर्थ कसा लावता यावर कायद्याचे यश अवलंबून : न्या. श्रीराम मोडक

मुख्यमंत्री म्हणाले की, मांगोर (वरुणापुरी) येथे २४ तास कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, हा पोलिस चौकी उभारण्याचा उद्देश आहे. ही चौकी मोफत उपलब्ध करून देणाऱ्या क्रिश लॉजिस्टिक्सचे त्यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com