Manipurमधील कायदा, सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे

विविध संघटना, नागरिकांची आझाद मैदानात निदर्शने : शांतता प्रस्थापित करण्याची मागणी
Manipur
ManipurDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Violence 2023: मणिपूरच्या जनतेशी एकजूट दाखवत गोव्यातील विविध संघटना आणि नागरिकांनी बुधवारी आझाद मैदानावर निदर्शने केली.

मणिपुरात न्याय आणि शांतता प्रस्थापित करण्याची मागणी यावेळी केली. तसेच गोव्याला भेट देणाऱ्या राष्ट्रपतींनी मणिपूरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असेही आवाहनही केले.

Manipur
Indian Army: "माझे अपहरण झाले आहे, पैसे घेऊन या…"; लष्करी जवानाच्या कॉलनं खळबळ

मणिपूर राज्यात शांतता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी अनेक स्थानिक आणि संघटनांनी बुधवारी आझाद मैदानावर शांततापूर्ण निदर्शन केले.

आंदोलकांनी मणिपूर राज्यात झालेल्या अमानुष कारवाया आणि घटनांचा निषेध केला. तसेच मणिपूरच्या लोकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते एल्विस गोम्स म्हणाले की, मणिपूरमध्ये घडलेल्या अमानवी घटनांमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

आजच्या काळात आपण सुरक्षित आहोत की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय सत्तेचा वैयक्तिक फायद्यासाठी काहीजण वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Manipur
Indian Army : जवानांचे शापोरा किल्‍ल्यावर गिर्यारोहण

आम आदमी पक्षाच्या नेत्या एलिना साल्ढाणा म्हणाल्या की, मणिपूरच्या लोकांचे दुःख पाहून असह्य वेदना होत आहेत. आपल्याच भावा-बहिणींना बेदम मारहाण, बलात्कार, लुटालूट आदी घटना पाहून इथे जमलेले सगळे दुःखी आहेत.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. गोव्याला भेट देणाऱ्या राष्ट्रपतींनी मणिपूर राज्यातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com