Indian Army : जवानांचे शापोरा किल्‍ल्यावर गिर्यारोहण

स्वातंत्र्यदिनदिनी राज्यातील लष्कराच्या दोन संदेश प्रशिक्षण केंद्राच्या जवानांनी शापोरा किल्‍ल्यावर गिर्यारोहण मोहीम राबवली.
Indian Army
Indian Army Dainik Gomantak

स्वातंत्र्यदिनदिनी राज्यातील लष्कराच्या दोन संदेश प्रशिक्षण केंद्राच्या जवानांनी शापोरा किल्‍ल्यावर गिर्यारोहण मोहीम राबवली. मेजर नीलेश कुमार शुक्ला यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

Indian Army
Meat Waste in Car: कारमध्ये मांस कचरा; मालकास 25 हजारांचा दंड

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत लष्करी ठाण्यांनी 74 ठिकाणी गिर्यारोहण मोहीम राबवली त्यात या मोहिमेचा समावेश होता.

श्रीमंत भारतीय वारशाची माहिती व्हावी, शारीरिक तंदुरुस्ती तपासावी आणि साहस निर्माण करावे या हेतूने ही मोहीम आखण्यात आली होती. शापोरा किल्ल्यावर गेलेल्या पथकात एक कनिष्ठ अधिकारी व दहा जवानांचा समावेश होता.

Indian Army
MLA Pravin Arlekar यांची सरकारी कार्यालयांना अचानक भेट

सकाळी सहा वाजता बांबोळी येथून या मोहिमेस सुरवात केली. त्यांनी पुणे येथील गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्थेच्या स्वयंसेवकांनी साहाय्य केले.

22 किलोमीटर पार करून हे पथक वागातोर येथे एकत्र आले आणि त्यांनी किल्ल्यावर अपारंपरिक मार्गाने चढाई केली. दीड तासात ते या मार्गाने किल्ल्यावर पोचले. त्यांनी किल्ल्यावर ध्वजारोहणही केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com