ST Reservation गोव्यात सध्या राजकीय क्षेत्रात ‘एसटी’ समाजाने जो राजकीय आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे बरीच उलथापालथ होईल, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक बाळगून आहेत.
तशातच संपलेल्या आठवड्यात दिलीप व मंगेश यांच्या बलिदानदिनाचे औचित्य धरून येथील लोहिया मैदानावर ‘एसटी’च्या विविध मागण्यांना पाठिंबा देऊन आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमात काँग्रेस नेते सहभागी झाले.
नंतर त्या पक्षाने ‘एसटी’च्या आरक्षण मागणीस पाठिंबा जाहीर करून राजकीय डाव टाकला आहे. त्याचा प्रत्यक्षात कितपत लाभ त्या पक्षाला होतो, ते आगामी काळच दाखवून देणार आहे.
मडगावातील या धरणे कार्यक्रमात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व अन्य नेते सहभागी झाले. तेव्हा तो पक्ष त्या मागणीला पाठिंबा देईल, असा कयास अनेक राजकीय धुरीणांनी केला होता.
दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेश समिती व विधिमंडळ गट यांच्या झालेल्या बैठकीत तसाच निर्णय झाला. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी तर या निर्णयाचा पक्षाला मोठा लाभ होईल, असा विश्वास आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिण गोव्यात या समाजाची एकगठ्ठा मते आहेत. पूर्वी ती काँग्रेसबरोबरच होती. ती नंतर जरी भाजपबरोबर गेलेली असली, तरी तो मतदार गेल्या दहा वर्षात भाजपवर नाराज आहे. तो आता काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. ही एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
...काँग्रेसचा होरा!
एसटी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला असून दक्षिण गोव्यात काणकोण, केपे व सांगे या तालुक्यात एसटी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. पैकी केपे मतदारसंघ सोडला तर अन्य सध्या भाजपकडे आहेत. तीच काँग्रेससाठी डोकेदुखी होती.
एसटीच्या मागणीला पाठिंबा देण्यामागे तेच खरे कारण आहे. या आरक्षण मागणीस लोकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहिला तर एसटी मतदार आपणाकडे वळू शकतील, हा काँग्रेसचा होरा आहे.
मतपरिवर्तन होईल का?
निरीक्षक म्हणतात, केपेत काँग्रेसचे आमदार एल्टन आहेत, तर त्या उलट एसटीबहुल मतदारसंघात भाजपकडे काब्राल (कुडचडे) व सुभाष फळदेसाई (सांगे) असे दोन मंत्री तसेच रमेश तवडकर (काणकोण) हे सभापती आहेत व त्यांचे मतदारांवर जबरदस्त वर्चस्वही आहे. पण म्हणून आरक्षण मुद्द्यावर त्यांचे मतपरिवर्तन करणे शक्य होईल का? याबाबत काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.