

वाळपई: वाळपई–पणजी मार्गावरील रेडिघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण स्वयंअपघातात कार पुलावरून थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. जखमींना तातडीने वाळपई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यापैकी दोघांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.अपघाताची तीव्रता मोठी होती. कार पुलावरून खाली दरीत कोसळून मधोमध अडकून पडली होती. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार फोंडाहून होंडाच्या दिशेने जात असताना रेडिघाट परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.
अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कारमध्ये महिला, युवती आणि पुरुष असा पाच जणांचा समावेश होता.
रेडीघाट परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीही याच ठिकाणी कार दरीत कोसळण्याची घटना घडली होती. बुधवारी एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.