Illegal Construction: अवैध बांधकामावर पुन्हा हातोडा

अवैध बांधकामावर पुन्हा वाळपई पालिकेने धडक कारवाईस सुरुवात केली आहे.
Illegal Construction
Illegal ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi Illegal Construction: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग, 9 मधील म्हाऊस येथील मुबारक अली खान यांच्या बंगल्यावर काल वाळपई पालिकेने धडक कारवाईस सुरुवात केली आहे. घटनास्थळी सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सविस्तर माहितीनुसार खान यांच्याविरोधात अवैध बांधकाम केल्याप्रकरणी अमीना बी शेख, शमसुद्दीनीशा खान, बद्रुनीशा खान, आफताब खान आदींनी न्यायालयात धाव घेतली होती. 2017 पासून खटला सुरू होता. त्यानंतर हा खटला नगर नियोजन खात्याकडे गेल्यानंतर 2018 मध्येच न्यायालयाने खान यांचे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.

मात्र, हा खटला उच्च न्यायालयात गेल्याने कारवाईस स्थगिती मिळाली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने ते बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे पालिकेने बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मुबारक अली खान यांचे कुटुंबीय कारवाईत अडथळा आणत होते.

यावेळी उपस्थित सत्तरी संयुक्त मामलेदार अपुर्वा कर्पे, पालिका मुख्याधिकारी सूर्याजी राव राणे, नगरपालिका अभियंता हरिष कलंगुटकर, पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते आदींची कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न केला.

Illegal Construction
Goa News: आज होणार नॉलेज टर्मिनस 0.5चे उद्‌घाटन

मात्र, मुबारक अली खान यांचे कुटुंबीय घरातून बाहेर आलेच नाहीत. मात्र कडक बंदोबस्तात अखेर अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.

पालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांनी सांगितले की, पालिकेचे कर्मचारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईसाठी घटनास्थळी पोहचले होते. मात्र मुबारक अली खान यांचे कुटुंबीय बांधकाम पाडण्यास सहकार्य करत नसल्याने नंतर पोलिस फौज बोलविण्यात आली.

कारवाई सुरू केल्यानंतर संबंधित घर मालकांचे म्हणणे होते, की त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बांधकाम पाडण्यासाठी स्थगिती आणली आहे. मात्र संध्याकाळी उशीरा पर्यंत त्यांच्याकडून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही. आता शनिवार, रविवार सुट्टी असल्याने पुढील बांधकाम पाडण्याचे सोमवारनंतरच होणार आहे.

Illegal Construction
Goa Police: चोरीचा तपास लावण्यात पर्वरी पोलिसांना आले यश

अनेक अवैध बांधकामांवर कारवाईने खळबळ

वाळपई नगरपालिका क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई होत आहे. चार दिवसांपूर्वी वेळूस वाळपई येथे दाऊद शेख यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले आहे व आज मुबारक अली खान यांच्या बंगला पाडण्यास सुरूवात झाली.

या कारवाईमुळे वाळपई भागातील बेकायदेशीर बांधकामांवर आळा बसणार आहे. तसेच टप्प्याटप्याने अनेक अवैध बांधकामाविरुध्द कारवाई होणार असल्याचे समजते. त्यामुळे वाळपई भागात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com