Forest Festival : रक्तदान, वन महोत्सव ही सामाजिक चळवळ बनवा : प्रदीप गवंडळकर

Forest Festival Valpoi : ब्रह्माकरमळीत वनमहोत्सव उत्साहात
Forest Festival Valpoi 2024
Forest Festival Valpoi 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई, पर्यावरणाचे जतन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर माणसाचे जीवनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे वन महोत्सव आणि रक्तदान शिबिरे यांची खूप गरज आहे.

रक्तदान शिबिरे आणि वन महोत्सव प्रत्येक गावागावांत सामाजिक चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन गोवा सरकारचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विजेते सर्पमित्र आणि योग शिक्षक प्रदीप गवडळकर यांनी केले.

ब्रह्माकरमळी - सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थान सभागृहात श्री ब्रह्मदेव सेवा समिती, माजी विद्यार्थी संघटना सरकारी महाविद्यालय साखळी, राष्ट्रीय सेवा योजना युनिट साखळी, सी एच सी वाळपई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर, वन महोत्सव आणि महिला मेळाव्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्राचार्य जेरवासियो मेंडिस, नगरगावच्या सरपंच संध्या खाडिलकर, ॲड. शिवाजी देसाई, ब्रह्मदेव सेवा समितीचे अध्यक्ष सागर देसाई, उपाध्यक्ष वामनराव देसाई, वाळपई हेडगेवार महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलांगी शिंदे, सर्वज्ञ पाटील उपस्थित होते.

प्रा. जेरवासियो मेंडिस म्हणाले, साखळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. ब्रह्माकरमळीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करून गावातील तरुणांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.

Forest Festival Valpoi 2024
Para Badminton World C'Ships: भारताच्या यथिराज, प्रमोद अन् कृष्णाने उचांवली तिरंग्याची शान, सुवर्ण पदकावर कोरले नाव

या कार्यक्रमात सत्तरी तालुक्यातील माजी भारतीय सैनिक चंदन ठाकूर, संदीप गवस, प्रमोद पळ, संदेश पळ, सागर सावंत, कृष्णा धुरी, दामू गावकर, रामनाथ गावडे, कृष्णा गावस, सुरेश नायर, विलास सावंत, उमेश गावस आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल आदीत्य बोट्टरकर, पोलिस निरीक्षक श्याम धुरी, डॉ. सुमन तारी, मॉविन फर्नांडिस, प्रणिता गावकर, मुख्याध्यापिका निलांगी शिंदे, ॲड. सर्वज्ञ पाटील, सरपंच संध्या खाडिलकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ब्रह्माकरमळी ग्रामस्थांच्या वतीने साखळी महाविद्यालयाचे प्राचार्य जेरवासियो मेंडिस यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन वामनराव देसाई आणि सरपंच संध्या खाडिलकर यांनी गौरव केला. महिला मेळाव्यात निलांगी शिंदे यांनी महिलांच्या विविध समस्या आणि महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com