Para Badminton World C'Ships: भारताच्या यथिराज, प्रमोद अन् कृष्णाने उचांवली तिरंग्याची शान, सुवर्ण पदकावर कोरले नाव

India in Para Badminton World Championship: वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
Para Badminton India Team
Para Badminton India TeamX/BAI_Media
Published on
Updated on

Suhas Yathiraj, Pramod Bhagat, and Krishna Nagar won gold medals in Para Badminton World Championship

रविवारी भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूंनी तिरंग्याची शान वाढवली आहे. वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

भारताचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोदने एसएल3 प्रकारात एकेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डॅनिएल बेथलला 14-21, 21-15, 21-14 अशा फरकाने पराभूक केले आणि वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे त्याचे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी त्याने 2015 आणि 2019 मध्येही सुवर्ण यश मिळवले होते.

Para Badminton India Team
National Senior Badminton: गोव्याची तनिशा क्रास्टो मिश्र दुहेरीत राष्ट्रीय विजेती

तसेच कृष्णानेही एसएच6 प्रकारात एकेरीमध्ये रविवारी चीनच्या लीन नैलीला 22-20, 22-20 अशा फरकाने पराभूत करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यापूर्वी त्यानेही टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकेल होते.

40 वर्षीय सुहास यथिराजने रविवारी एसएल4 प्रकारातील एकेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानला 21-18, 21-18 अशा फराकाने अंतिम सामन्यात पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Para Badminton India Team
Badminton Asia Team Championships: ऐतिहासिक! भारतीय महिला आशियाई चॅम्पियन, पीव्ही सिंधूसह पुन्हा चमकली 17 वर्षीय अनमोल

या तिघांच्या सुवर्णपदकांशिवाय महिलांच्या एसयू5 प्रकारात एकेरीमध्ये भारताच्या मनिषा रामदास हिला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम सामन्यात चीनच्या यांग क्यु शियाने 16-21, 16-21 अशा फरकाने पराभूत केले.

तसेच एसयू5 प्रकारात पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग बारेठा आणि राज कुमार यांना, तर एसएच6 प्रकारात महिला दुहेरीत भारताच्या रचना शैलेशकुमार आणि नित्या श्री सुमथी सिवन यांना अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

महिला दुहेरीत तुलासिमती एम आणि मानसी जोशी यांनाही रौप्य पदक मिळाले. त्याचबरोबर सुकांत कदम, मनोज सरकार आणि नितेश कुमार यांनी कांस्य पदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com